शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कुख्यात दरोडेखोर  दारासिंग बावरीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:26 IST

मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बहुचर्चित ठवकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील चौथा कुख्यात आरोपी दारासिंग ऊर्फ सतवनसिंग वकिलसिंग बावरी (४६) याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : बहुचर्चित ठवकर ज्वेलर्स दरोडा - खून  प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बहुचर्चित ठवकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील चौथा कुख्यात आरोपी दारासिंग ऊर्फ सतवनसिंग वकिलसिंग बावरी (४६) याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.बावरीला भादंविच्या कलम ३०२ (खून)अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ३९८ (सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न) व कलम १२०-ब (कट रचणे)अंतर्गत प्रत्येकी सहा वर्षे कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास, अशी एकूण शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो अण्णाभाऊ साठेनगर झोपडपट्टी, मेहकर, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहे. यापूर्वी २०१४ मध्ये न्यायालयाने आरोपी बन्नासिंग व जुल्फीसिंग यांना कमाल जन्मठेप तर, पंकेजसिंगला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. बावरी घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याला २०१५ मध्ये अटक करण्यात आली व आवश्यक तपासानंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारने न्यायालयात बावरीविरुद्ध १० साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे बयान व उपलब्ध पुराव्यांवरून बावरीविरुद्ध वरील गुन्हे सिद्ध झाले. इतर आरोपींविरुद्ध १७ साक्षीदार तपासण्यात आले होते.हे प्रकरण हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. आरोपींनी शांत डोक्याने कट रचून ६ आॅक्टोबर २०१२ रोजी दुपारी १ च्या सुमारास मानेवाडा सिमेंट रोडवरील ठवकर ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. आरोपींकडे देशीकट्टा व अन्य घातक शस्त्रे होती. त्यांनी शोरुममध्ये शिरून कर्मचाऱ्यांना सोने, चांदी व अन्य मौल्यवान धातूंचे किमती दागिने बाहेर काढण्याची धमकी दिली. दुकान मालक विजय पांडुरंग ठवकर (३६) यांनी आरोपींचा विरोध केला. त्यामुळे जुल्फीसिंगने त्यांना देशीकट्ट्यातील गोळ्या झाडून ठार मारले. तसेच, कर्मचारी प्रसाद शरद खेडकर यांना आरोपींनी धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी लाखो रुपयांचा माल घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शोरुममध्ये पोहोचले व आवश्यक कारवाई पूर्ण केली. सहायक पोलीस आयुक्त टी. बी. गौड यांनी प्रकरणाचा तपास केला. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून