शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 9, 2023 18:00 IST

Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.

राकेश घानोडेनागपूर : आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आणि दंडाची रक्कम जमा न केल्यास त्याला दोन वर्षे अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी हा निर्णय दिला.

असीम पठाण ताज मोहम्मद पठाण (३९) असे आरोपीचे नाव असून तो काटोल रोड, मानकापूर येथील रहिवासी आहे. मृताचे नाव महिमा विटोले (२०) होते. ती छायाचित्रे व मेहंदी काढण्याचा व्यवसाय करीत होती. सोबतच उच्च शिक्षणही घेत होती. तिचे व असीमचे घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून प्रेम संबंध होते. दरम्यान, तिने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच असीमसोबत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर ते काही दिवस गुण्यागोविंदाने राहिले. परंतु, पुढे त्यांचे कोणत्याना कोणत्या कारणावरून खटके उडायला लागले. असीम महिमाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. परिणामी, त्यांचे नेहमी भांडण होत होते. त्यामुळे महिमा गोधनी रोडवरील शिवनगर येथील माहेरी राहायला गेली होती. असीमला तिचे माहेरी जाणेही पटले नाही. तो महिमाच्या लहान बहिणीला रोज फोन करीत होता व महिमाबाबत विचारपूस करून तिला त्रास देत होता. एक दिवस त्याने महिमा सासरी परत न आल्यास तिला ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. मात्र, तो एवढ्या टोकाला जाईल, असे कोणालाच वाटले नाही. ३० एप्रिल २०१८ रोजी रात्री ८ च्या सुमारास असीमने महिमाला फोन करून कोणत्यातरी अज्ञात कारणाने भेटण्यासाठी बोलावले. महिमाने त्याच्यावर विश्वास ठेवला व ती गोधनी रोडवरील गजानननगर परिसरात त्याला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी असीमने असावध व असहाय्य असलेल्या महिमावर धारदार चाकूने हल्ला केला व तिला जाग्यावरच ठार मारले.

फिर्यादीला भरपाई देण्याचा आदेशआरोपीने दंड जमा केल्यास ती रक्कम महिमाची आई फिर्यादी अंबिका विटोले हिला भरपाई म्हणून अदा करा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व इतर विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला. आरोपी १ मे २०१८ पासून कारागृहात आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय