शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलाच्या खुनात आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:03 IST

जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : ५० हजार रुपये दंडही ठोठावलानागपूर ग्रामीण तहसील कार्यालय आवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.गौतम मोतीराम भांगे (५९) असे आरोपीचे नाव असून, तो वलनी (खंडाळा) येथील रहिवासी आहे. मयताचे नाव शांताराम उकनराव भांगे (४७) होते. शांताराम पोलीसपाटील होते. त्यांचे आरोपीसोबत पटत नव्हते. गावामध्ये त्यांची अनेकदा भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी शांताराम रेशन दुकानाचा परवाना व पोलीस पाटीलपदाच्या नूतनीकरणासाठी ग्रामीण तहसील कार्यालयात आले होते. आरोपीही त्यांचा पाठलाग करीत कार्यालयात गेला होता. त्याच्याजवळ कुऱ्हाड होती. दरम्यान, आरोपीने संधी मिळताच शांतारामवर हल्ला केला. शांताराम यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे शांताराम गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शांताराम यांचे मित्र राजेंद्र नवघरे (२८) यांनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. सत्र न्यायालयात सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी १७ साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अ‍ॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयLife Imprisonmentजन्मठेप