शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुराच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: November 20, 2015 03:19 IST

जादूटोण्याच्या संशयावरून एका शेतमजुरावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा

सायगाव येथील घटना : शेतमजुरावर घातले होते कुऱ्हाडीचे घावनागपूर : जादूटोण्याच्या संशयावरून एका शेतमजुरावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही थरारक घटना २१ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायगाव या गावात घडली होती. सचिन श्रीपत लोखंडे (३०), असे आरोपीचे नाव आहे. कैलास रामाजी पाटील (५५), असे मृताचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी सचिन लोखंडे याच्या आईची प्रकृती सतत बिघडत असल्याने सचिन हा कैलास पाटील या शेतमजुरावर जादूटोण्याचा संशय घेत होता. याच कारणावरून घटनेच्या एक वर्षापूर्वी त्याने कैलाससोबत भांडणही केले होते. कैलास पाटील आणि त्याची पत्नी शोभा पाटील यांची दोन मुले पाच-सहा वर्षांपासून बाहेरगावी राहत असल्याने पती-पत्नी मिळेल त्याच्या शेतावर काम करून आपला प्रपंच चालवीत होते. त्यांचा एक मुलगा अमित हा नागपुरात तर प्रीतम हा नाशिकला राहत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून पती-पत्नी कवडू राऊतच्या शेतावर काम करीत होते. घटनेच्या दिवशी शोभाने सकाळी ९ वाजताच स्वयंपाक केला होता. आपल्या पतीला तिने शिदोरी आणि डबकीभर पाणी दिले होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कैलास पाटील हा कामासाठी शेतावर जाण्यास निघाला होता. त्याच्या मागेच शोभा होती. घरापासून अंदाजे ५० फूट अंतरावरील बोअरवेलजवळून कैलास जात असतानाच कुऱ्हाड घेऊन आलेल्या सचिन लोखंडे याने कैलासच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालणे सुरू केले होते. शोभा ही पतीच्या बचावासाठी धावली असता सचिनने तिच्यावरही कुऱ्हाड उगारली होती. भयावह दृश्य पाहून शोभा ही या घटनेची माहिती देण्यासाठी धावत पोलीस पाटील वासुदेव मानकर यांच्या घरी गेली होती. कैलासला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर सचिन हा रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह प्रमोद गेडाम याच्या घरी निघून गेला होता. या घटनेबाबत समजताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला होता. शोभा पाटील हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३०२, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या ३ (२) कलमान्वये गुन्हा दाखल करून सचिन लोखंडे याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. (प्रतिनिधी)दंडाच्या रकमेतील ४ हजार रुपये मृताच्या कुटुंबास देण्याचा आदेशन्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सबळ साक्षीपुराव्याच्या आधारावर आरोपी सचिन लोखंडे याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मृत कैलास पाटील याच्या कुटुंबाला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे यांनी तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. आर. आर. राजकारणे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. तवाडे, सहायक फौजदार दिलीप कडू, अरुण भुरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.