शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आयुष्याची सायंकाळ वेदनादायी...

By admin | Updated: May 22, 2016 02:46 IST

ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातले त्या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

‘त्यांना’ आमचा हक्क द्यायला सांगा : जन्मदात्यांची आर्त विनवणी नागपूर : ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातले त्या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ज्यांनी दुनिया दाखवली, त्यांचे होत असलेले हाल बघायला ते तयार नाहीत. त्यामुळे आयुष्याचा अखेरचा टप्पा अनेक जन्मदात्यांसाठी कमालीचा वेदनादायी ठरला आहे. अस्वस्थ करणारे हे वास्तव शुक्रवारी सायंकाळी पाचपावलीत ज्येष्ठांच्या एका बैठकीतून पुढे आले. बैठकीत जमलेल्या अनेक ज्येष्ठांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. ‘ते (मुले) आम्हाला किमान जगण्यासाठीही पैसे देत नाहीत, अशा तक्रारी केल्या आणि त्यांना ठाण्यात बोलवून आमचा हक्क द्यायला सांगा’, अशी विनंतीही केली. पाचपावली पोलीस ठाण्यात शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली. त्यात त्यांच्या अडीअडचणी, समस्या ऐकून घेण्याची औपचारिकता पोलिसांनी पार पाडली. या बैठकीत आप्तांच्या त्रयस्तपणाची अनेक उदहारणं नोंदली गेली. आपलेच आपल्या जीवावर उठणे कशाला म्हणतात, त्याचाही खुलासा झाला. अनेक वृद्धांनी कातर स्वरात पोटच्या मुलांच्या निष्ठूरपणाचे गाऱ्हाणे ऐकवले. त्याने मोठे व्हावे, चांगल्या कामधंद्याला लागावे म्हणून आम्ही हालअपेष्टा भोगल्या. पोटाला पीळ देऊन त्याचे भरणपोषण केले. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आता तो मोठा झाला. लठ्ठ पगार कमवतो, उडवतो. आम्हाला मात्र त्याने आता वाऱ्यावर सोडले आहे. आपुलकी आणि प्रेमाचे चार शब्द सोडा, दोन वेळचे जेवण, औषधोपचाराचीही सोय करायला नाही. मागून, म्हणूनही पैसे देत नाही, असे सांगून अनेकजणांनी आपला गहिवर मांडला.