शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग; यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:40 IST

माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संघभूमीतून केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देराममंदिराबाबत कायदा शक्य नसल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संघभूमीतून केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. यशवंत सिन्हा यांनी केंद्राकडून ‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप लावला. देशातील वित्तीय संस्थांना नुकसानीतून काढण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येत आहे. ‘आयएलअ‍ॅन्ड एफएस’चे हे संकट खूप मोठे आहे. मात्र यासाठी केंद्र सरकार ‘एलआयसी’च्या निधीचा उपयोग करत आहे. हा निधी जनतेच्या हक्काचा आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.या दोन्ही नेत्यांनी पत्रपरिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख हेदेखील उपस्थित होते. देशात सध्या आणिबाणीहून वाईट स्थिती आहे. पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच निर्णय घेतात. मंत्र्यांना पंतप्रधानांच्या निर्णयांची माहिती नसते. देश कुठे चालला आहे, असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी केला.विजयादशमी सोहळ््यादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राममंदिर निर्माणासाठी संसदेने कायदा करण्याची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे संसदेत कायदा करणे शक्यच नाही. मागील काही दिवसांपासून संघाकडून आपण बदलत असल्याचे दाखविण्यात येत आहे. याअंतर्गतच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उद्योगपती रतन टाटा, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना संघाने आपल्या कार्यक्रमांत आमंत्रित केले. मात्र राममंदिरावर वक्तव्य देऊन संघाचा जुना चेहरा व विचार कायम असल्याचे दाखवून दिले आहे, असे यशवंत सिन्हा म्हणाले.

मोदींनी माफी मागावीयावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्रावर प्रहार केला. ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘एनआयए’ यासारख्या संस्था सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त होत आहेत. सरकार निवडणुकींच्या कामाला लागली आहे. जनतेच्या समस्यांशी त्यांना काही घेणेदेणे नाही, असा आरोप त्यांनी केला. राफेल करारातील घोटाळ््याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. पंतप्रधान महापुरुषांना ‘हायजॅक’ करून आपली प्रतिमा चमकवत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.

जयंत सिन्हांना समजवू नाही शकतयशवंत सिन्हा यांना त्यांचे पुत्र व केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याबाबत विचारणा केली असता आम्ही एकमेकांच्या कामात दखल देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जयंत सिन्हा हे स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना समजवू शकत नाही, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा