शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून ‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग; यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:29 IST

माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संघभूमीतून केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देराममंदिराबाबत कायदा शक्य नसल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संघभूमीतून केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. यशवंत सिन्हा यांनी केंद्राकडून ‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप लावला. देशातील वित्तीय संस्थांना नुकसानातून काढण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येत आहे. ‘आयएलअ‍ॅन्ड एफएस’चे हे संकट खूप मोठे आहे. मात्र यासाठी केंद्र सरकार ‘एलआयसी’चा निधीचा उपयोग करत आहे. हा निधी जनतेच्या हक्काचा आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.या दोन्ही नेत्यांनी पत्रपरिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशीष देशमुख हेदेखील उपस्थित होते. देशात सध्या आणिबाणीहून वाईट स्थिती आहे. पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच निर्णय घेतात. मंत्र्यांना पंतप्रधानांच्या निर्णयांची माहिती नसते. देश कुठे चालला आहे, असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी केला.विजयादशमी सोहळ््यादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राममंदिर निर्माणासाठी संसदेने कायदा करण्याची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे संसदेत कायदा करणे शक्यच नाही. मागील काही दिवसांपासून संघाकडून आपण बदलत असल्याचे दाखविण्यात येत आहे. याअंतर्गतच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उद्योगपती रतन टाटा, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना संघाने आपल्या कार्यक्रमांत आमंत्रित केले. मात्र राममंदिरावर वक्तव्य देऊन संघाचा जुना चेहरा व विचार कायम असल्याचे दाखवून दिले आहे, असे यशवंत सिन्हा म्हणाले.मोदींनी माफी मागावीयावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्रावर प्रहार केला. ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘एनआयए’ यासारख्या संस्था सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उध्वस्त होत आहेत. सरकार निवडणूकींच्या कामाला लागली आहे. जनतेच्या समस्यांशी त्यांना काही घेणेदेणे नाही, असा आरोप त्यांनी केला. राफेल करारातील घोटाळ््याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. पंतप्रधान महापुरुषांना ‘हायजॅक’ करुन आपली प्रतिमा चमकवत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.जयंत सिन्हांना समजवू नाही शकतयशवंत सिन्हा यांना त्यांचे पुत्र व केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याबाबत विचारणा केली असता आम्ही एकमेकांच्या कामात दखल देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जयंत सिन्हा हे स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना समजवू शकत नाही, असेदेखील ते म्हणाले.

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा