शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 21:15 IST

Nagpur News तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

 

नागपूर : तृतीयपंथीयांना निवासाची सोय व्हावी व त्यांना हक्काची घरे मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

समाजकल्याण आयुक्त नागपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व नागपूर सुधार प्रन्यासमधील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे चिखली व कळमना येथे तयार करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांच्या संकुलास भेट दिली. लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून ही घरे तृतीयपंथीयांना वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रादेशिक उपायुकत डॉ. सिद्धार्थ गायकवाड, समाजकल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख व नागपूर सुधार प्रन्यासचे पदाधिकारी उपस्थित होते.

समाजकल्याणमध्ये सेवानिवृत्तांच्या प्रश्नांसाठी विशेष मोहीम

समाजकल्याण विभागामध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी विभागाच्या वतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

समाजकल्याण आयुक्तालयाने विभागाच्या विविध संवर्गातील १६० कर्मचाऱ्यांना नुकताच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला असता, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :LGBTएलजीबीटी