Letter to the mayor for the dismissal of the Nagpur Municipal Corporation's BSP group leader Jamal | नागपूर महापालिकेतील बसपाचे गटनेते जमाल यांच्या बरखास्तीसाठी महापौरांना पत्र
नागपूर महापालिकेतील बसपाचे गटनेते जमाल यांच्या बरखास्तीसाठी महापौरांना पत्र

ठळक मुद्देवादामुळे समिती सदस्यांची निवड रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असूनही पक्ष विरोधी कारवाया केल्याने महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल मो. इब्राहीम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना गटनेतेपदावरून बरखास्त करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी मंगळवारी महापौरांना दिले आहे. मात्र यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नसल्याने बसपाच्या गटनेतेपदाचा वाद निर्माण झाला आहे.
गटनेता निवडण्याची प्रक्रिया पक्षस्तरावर पूर्ण झालेली नसल्याने सर्वसाधारण सभागृहात तसेच महापालिकेतील कार्यवाहीत पक्षाच्या वतीने कुठल्याही निर्णयात मो. जमाल यांचा सहभाग विचारात घेऊ नये. महापालिकेतील विशेष समित्यावर बसपाच्या कोट्यातील सदस्यांची निवड गटनेत्यांच्या नियुक्तीपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी, अशी विनंती साखरे यांनी या पत्रात केली आहे.


Web Title: Letter to the mayor for the dismissal of the Nagpur Municipal Corporation's BSP group leader Jamal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.