शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

चला करू या मैत्री विज्ञानाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:21 IST

ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २१ वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रभाषा भवन परिसरात भरला अपूर्व विज्ञान मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २१ वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशनद्वारे या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रभाषा भवनात करण्यात आले आहे.रिफिल, प्लास्टिकच्या बॉटल्स, सेल, तांब्याची तार, कंचे, चेंडू, चुंबक, फुगा, दगड, माती यापासून विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत अपूर्व विज्ञान मेळाव्यातून सहज सोप्या पद्धतीने मांडले आहेत. विज्ञानाच्या बाबतीत येणारे का? आणि कसे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची प्रचिती या मेळाव्यातून येते. ‘चला करू या विज्ञानाशी मैत्री’या संकल्पनेतून विज्ञानाची डोकेदुखी येथे सहज सोपी झालेली दिसते आहे. हे सर्व प्रयोग महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. मुलांच्या सुप्तगुणांचा विकास या मेळाव्याच्या माध्यमातून होतो. वेस्टपासून विद्यार्थ्यांनी हे प्रयोग साकारले असून, यातून न्यूटनचा सिद्धांत, बर्नालीने सांगितलेला हवेच्या दाबाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची प्रचिती येते. या विज्ञान मेळाव्यात ३५ शाळेतील विद्यार्थ्यांचे १३० प्रयोग आहेत. हे सर्व प्रयोग विद्यार्थ्यांना आकर्षित करीत असल्याचे मार्गदर्शक दीप्ती बिस्ट यांनी सांगितले. या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्याहस्ते झाले.

कसे उडतात तुषारकाचेच्या बाटलीमध्ये भरलेले पाणी आणि झाकणावर लावलेली रिफिल, विद्यार्थिनीने फुंकर मारली की भरभर तुषार उडतात. का? तर हवेचा दाब पाण्याला वर ढकलतो.

चंद्र-सूर्य दिसतात एकाच अंतरावरपृथ्वीवरून सूर्य व चंद्र एकाच आकाराचे दिसतात, हे अतिशय रंजक पद्धतीने सूर्य-चंद्र आणि पृथ्वीतील अंतर दाखविले आहे.

एका खिळ्यावर किती खिळेविद्यार्थ्याने मांडलेला हा प्रयोग डोक्याला झणझणी आणतो. कारण उभ्या असलेल्या एका खिळ्यावर तो विद्यार्थी कितीतरी खिळे मांडतो.

कुछ कुछ एलियन जैसावाकलेल्या तारेला बांधलेले दोन चेंडू बघितल्यावर काय असेल हे, असे कुतुहलाने वाटते. पण हा तार जेव्हा डोक्यावर ठेवतो, तेव्हा चेंडू आपल्या डोक्यावर लटकलेले असतात. हा प्रयोग स्वसंतुलनावर आहे. त्याला विद्यार्थ्याने कुछ कुछ एलियन जैसा असे नाव दिले आहे.

आपले हात कधीच स्थिर राहत नाहीएक स्केल आणि त्याला लागलेली एक पिन आपल्याला दाखविते की आपले हात कधीच स्थिर राहत नाही.

टॅग्स :scienceविज्ञान