शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

तर अंगणवाड्या बंद करू

By admin | Updated: August 28, 2014 02:01 IST

शासनाने लागू केलेल्या वाढीव रकमेसह पाच महिन्यांपासून थकीत असलेले मानधन सात दिवसात मिळाले नाही तर अंगणवाड्या बेमुदत बंद करू, असा इशारा अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी दिला.

सेविकांचा इशारा: मानधन थकीतनागपूर : शासनाने लागू केलेल्या वाढीव रकमेसह पाच महिन्यांपासून थकीत असलेले मानधन सात दिवसात मिळाले नाही तर अंगणवाड्या बेमुदत बंद करू, असा इशारा अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी दिला. राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या (आयटक) नेतृत्वात बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने सेविका उपस्थित होत्या. थकित असलेले मानधन त्यातच केंद्र सरकारने प्रत्येक अंगणवाडीत आणखी एक महिला कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्तीला सेविकांचा विरोध आहे. सेविकांना नियमित मानधन न देणाऱ्या सरकारतर्फे अंगणवाडीत गरज नसताना तिसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कशासाठी केली जाते असा सवाल त्यांनी केला. त्याऐवजी आहे त्या सेविकांचेच मानधन वाढवून त्यांच्याकडून अतिरिक्त काम करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. दरम्यान गेल्या दिवाळीचे भाऊबीज अनुदान कामठी प्रकल्पातील सेविकांना मिळाले नाही, यासाठी अनुदान आले होते. पण अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ते वाटप होऊ शकले नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व सात दिवसाच्या आत थकीत मानधनाचे वाटप करावे, अशी मागणी संघटनेच्या सचिव जयश्री चहांदे यांनी केली. अन्यथा मासिक अहवाल पाठविणे बंद करून बेमुदत काळासाठी अंगणवाड्या बंद केल्या जातील, असा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.दुपारी संघटनेचे एक शिष्टमंडळ उपायुक्तांना भेटले व त्यांना मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आंदोलनात रेखा कोहाड, वनिता कापसे, कल्पना शेवाळे, कल्पना गिरडकर, शारदा गडेकर, मंगला रंगारी,शैला काकडे, आशा शेंडे, विद्या गजभिये, स्वाती उके, वर्षा मानकर, मंगला चामट, सुनीता मानकर, उषा सहारे, कल्पना चाफले, जास्वंदा खोब्रागडे, लक्ष्मी वाढिवे, ज्योती अंडरसहारे,अनिता मेश्राम, प्रिती बोरकर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.(प्रतिनिधी)