शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 20:14 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी आपण सर्व गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी आपण सर्व गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याचे शहरात पालन व्हावे, यासंदर्भात आयुक्तांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी संवाद साधला.छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, प्रभारी उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त, साहस गणेशोत्सव मंडळ प्रतापनगरचे गोपाल बोहरे, श्री बालमित्र गणेशोत्सव मंडळ छापरूनगरचे आकाश राजनानी, श्री तरुण बालमित्र गणेशोत्सव मंडळ मच्छीसाथचे विनोद लारोकर, दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ महालचे अक्षय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.२२ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून दीड ते दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र या उत्सवात सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळले जाईल, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. शासन दिशानिर्देशानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची दोन फुटापर्यंत तर सार्वजनिक गणपतीची उंची चार फुटापर्यंतच असावी. मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचेच पूजन करावे. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच करण्यात यावे. विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीतकमी वेळात घरी पोहचावे. शासनाच्या या निर्देशाचे पालन होईल याची सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जनजागृती करागणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता रक्तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी. गणपती मंडपाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी. शासन नियमांची जनजागृती करून सर्व गणेश मंडळांनी स्वत:सह इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेGanpati Festivalगणेशोत्सव