शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वसुली कमी तर वेतनही कमी! नागपूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 21:21 IST

३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा अन्यथा वसुली कमी तर वेतनही कमी मिळेल, अशी तंबी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी शनिवारी बैठकीत दिली.

ठळक मुद्देमहापौर व आयुक्तांनी दिला अल्टीमेटममॅराथॉन बैठकीत आर्थिक स्थितीवर मंथन

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेची र्आिर्थक स्थिती बिकट आहे. स्थायी समितीने अर्थसंकल्पात २,२७२ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु गेल्या सात महिन्यात ९४१ कोटींचाच महसूल जमा झाला. कर वसुली कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. कुठलाही कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा अन्यथा वसुली कमी तर वेतनही कमी मिळेल, अशी तंबी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी शनिवारी बैठकीत दिली.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याबाबतचे वृत्त लोकमतने  प्रकाशित करून याकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेत शनिवार सुटीचा दिवस असूनही मुख्यालयात मॅराथॉन बैठक घेण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, डॉ. आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, स्थावर अधिकारी आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.कर वसुलीला गती नाही. यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर स्थायी समितीने दिलेले उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. थकबाकी वसुलीसाठी ‘अभय योजना’ राबविली. नागरिकांना संधी देण्यात आली. या योजनेंतर्गत करावरील शास्ती ९० टक्के माफ करण्यात आली होती. या योजनेचाही ज्यांनी लाभ घेतला नाही अशा बकायाधारकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून त्याची लिलावाद्वारे विक्री करून थकीत कराची रक्कम दंडासहित वसूल करा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.वसुलीसाठी मायक्रोप्लॅनिंगआर्थिक वर्ष संपण्यासाठी १३० दिवस शिल्लक आहेत. दिवस कमी असल्याने उद्दिष्ट गाठण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग करा. याबाबतचा आराखडा उद्या सोमवारी पदाधिकारी आणि आयुक्तांपुढे ठेवा, असे निर्देश कर आकारणी व कर वसुली, पाणीपुरवठा विभागाचे सहायक आयुक्त तसेच झोनच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले.वसुलीचा दररोज आढावासोमवारपासून दररोज संबंधित विभागांच्या वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विभागप्रमुख आणि उपायुक्त कर वसुलीवर नियंत्रण ठेवतील. प्रत्येक आठवड्याला कोअर कमिटी याचा आढावा घेणार आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर