शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 23:55 IST

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला.

ठळक मुद्देपगमार्कही आढळले : यापूर्वी दिसला होता शनिवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला. सोसायटी परिसरातच तो टिन शेडमध्ये राहतो. रात्री १.३० च्या सुमारास त्याला सोसायटी परिसरात आवाज आला. त्यामुळे त्याने दार उघडले असता बाहेर एक बिबट्या सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमधून झाडांकडे जाताना दिसला. बिबट्या गेला याची खात्री केल्यावर काही वेळाने तो हिंमत करून संबंधित इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहचला. तिथे त्याने बिबट्याचे पगमार्क पाहिले.मंगळवारी सकाळी त्याने सोसायटीमधील नागरिकांना बिबट्यासंदर्भात माहिती दिली. सोसायटीतील सबीर गुप्ता यांनी दीपकने दाखविलेल्या ठिकाणावरून बिबट्याचे पगमार्कचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण केले.या पूर्वीही शनिवारी ७ डिसेंबरला सबीर गुप्ता यांना सकाळी ७.३० वाजता मॉर्निंग वॉकवरून परतताना याच परिसरात बिबट्या दिसला होता. मात्र त्या वेळी त्याचे पगमार्क आढळले नव्हते. या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. गोकुळ सोसायटी गोरेवाडा वनक्षेत्राला अगदी लागूनच असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नाकारता येत नसल्याचे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.अंबाझरीत रात्री फिरवला ड्रोनअंबाझरी वनक्षेत्राच्या वाडीला लागून असलेल्या वन क्षेत्रामध्ये सोमवारी रात्री बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने या परिसरात पहाणी केली. रात्री उशिरापर्यंत ड्रोनही या परिसरात फिरविला. मात्र पत्ता लागू शकला नाही. तिकडे, अंबाझरीतील बिबट्याला पकडण्यासाठी वन मुख्यालयाकडे परवानगी मागितली जात आहे. मात्र या प्रक्रियेला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पिंजरे लावण्यात आलेले नाहीत.वाघ लोकेशनबाहेरचमागील चार दिवसांपासून मिहान परिसरातील वाघाचा पत्ता लागलेला नाही. शुक्रवारी ६ डिसेंबरला खडका शिवारातून कान्होलीबारावरून टाकळघाट पर्यंतचा मार्ग पार करून तो टेकडी डोंगरगांव रिठी येथे पोहचला होता. त्यानंतर तो बोर प्रकल्पाच्या दिशेने पुढे निघाल्याचे संकेत वन विभागाला मिळाले होते. मात्र ते खोटे निघाले. शनिवारी तो दुसऱ्यांदा तेल्हारा तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून त्याच्या शोधासाठी पथकांची धावाधाव सुरू आहे. अद्यापही त्याचे लोकेशन मिळाले नाही. यापूर्वी तो वारंवार बुटीबोरी वन क्षेत्रच्या खडका, गुमगाव आणि मोंढापर्यंत फिरून पुन्हा मिहान परिसरात परतला होता. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याला ट्रॅक्युलाइज करण्याची तयारी केली होती. यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून वाघाला बेशुद्ध करून पकडल्यावर त्याच्या मुळ अधिवासात सोडण्यासाठी मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.वाघाने केली दोन वासरांची शिकारकुही तालुक्यातील तारणा गावाच्या मांढळ बिट क्षेत्रातील एका शेतामध्ये सोमवारी रात्री वाघाने दोन वासरांची शिकार केली. ही घटना प्रादेशिक क्षेत्राच्या उत्तर उमरेड रेंजच्या कुही तारणा परिसरात रात्री १२ वाजतानंतर घडली. शेतमालक आनंद पडोळे यांनी आपल्या शेतामध्ये दोन वासरे बांधून ठेवली होती. सकाळी येऊन बघीतल्यावर दोन्ही वासरे मृतावस्थेत दिसली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून आरएफओ घनश्याम ठोंबरे, आरएफओ अंबरलाल मडावी पथकासह पोहचले. घटनास्थळी वाघाचे पगमार्क आढळले. या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर