शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:20 IST

येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देतयारी वेगात : संपूर्ण परिसर ‘रेनप्रुफ’ करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.यंदाचे अधिवेशन हे पावसाळी असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या दृष्टीनेच संपूर्ण तयारी सुरू आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गेल्याच आठवड्यात तयारी संबंधात आढावा घेतला होता. त्यानुसार विधानभवन परिसर हा संपूर्णपणे ‘रेनप्रुफ’ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच तयारी सुरू आहे. यंदा रंगरंगोटीचे काम जास्त नाही. कारण हिवाळी अधिवेशनातच रंगरंगोटी झाली. देखभल दुरुस्ती व पावसापासून संरक्षण यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यासाठी विधानभवनाच्या मुख्य गेटपासून ते इमारतीपर्यंत शेड टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्री ज्या गेटने आपल्या कक्षात प्रवेश करतात त्या बाजूनेही टिनाचे शेड उभारले जात आहे. याशिवाय विधानभवन परिसरातील विविध राजकीय पक्षांची कार्यालये सुद्धा रेनप्रूफ केली जात आहेत. विधिमंडळ सचिवालयातील काही कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. कार्यालयांमध्ये फाईल लावणे व कॉम्प्युटर लवण्यात आले आहे. इतर कार्यालयांमध्येही कामे सुरू आहेत.रविभवन, नागभवन आमदार निवास रेनप्रूफअधिवेशनसाठी येणारे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि अधिकारी वर्गाच्या निवासस्थानाच्या ठिकाणी सुद्धा पावसापासून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली जात आहे. रविभवन, नागभवनातील कॉटेजसमोर शेड उभारले जात आहेत. यासोबतच आमदार निवास परिसरातही जोरात तयारी सुरू आहे. आमदार निवासाच्या दोन्ही इमारतीमध्ये कायमस्वरूपी लोखंडी शेड उभारले जात आहे.सर्पमित्र तैनातपावसाचे दिवस पाहता विधानभवन परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सर्पमित्रांची मदत घेतली आहे. विधानभवन परिसरात तयारी करीत असताना साप निघण्याच्या घटना घडतही असतात. याही वेळी साप निघाला होता. त्यामुळे आवश्यक खबरदारी म्हणून सर्पमित्र तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते.‘देवगिरी’वर चंद्रकांत पाटलांचाच दावा?नागपुरात अधिवेशन असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीनंतर सर्वाधिक आकर्षणाचा बंगला म्हणजे ‘देवगिरी’च असतो. आजवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुक्काम देवगिरीवर राहिलेला आहे. देवगिरीवर मुक्काम म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतरचे मंत्री अशी आजवरची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे देवगिरीवर मुक्कामास राहणे हे एकप्रकारचे ‘स्टेटस’सुद्धा मानले जाते. महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्रिपद नाही. चंद्रकांतदादा पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवगिरीवर त्यांचाच दावा केला जात आहे. सध्या मंत्र्यांना निवासस्थाने वितरित झालेली नाहीत. तरीही देवगिरी बंगल्यावर ज्या जोमाने तयारी सुरू आहे, त्यावरून हा बंगला कुणाला मिळतो, याची प्रतीक्षा आहे.    

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर