शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

विधिमंडळाचे सचिवालय २२ पासून नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:45 IST

येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, असे निर्देश विधानमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गुरुवारी दिले. विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीसाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देअनंत कळसे : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, असे निर्देश विधानमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गुरुवारी दिले. विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीसाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलैपासून विधानभवन, नागपूर येथे सुरू होणार आहे. या अनुषंगाने विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्री परिषद दालन कक्षात विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत विभागीय आयुक्त अनुप कुमार, उपसचिव विलास आठवले, सभापती सचिव म.मु काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल,पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे, कक्ष अधिकारी तथा मालमत्ता व्यवस्थापक मधुकर भडेकर,पद्धती विश्लेषक अजय सरवणकर, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, रेल्वे, भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड, महानगरपालिकेसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.तत्पूर्वी कळसे यांनी विधानसभा, विधान परिषद सभागृह तसेच रविभवन, आमदार निवास, १६० खोल्याचे गाळे यांची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीबाबत सूचना केल्यात.‘रेनप्रूफ’ उपाययोजना कराहवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या जुलै महिन्यात १० ते १२ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पोलीस कर्मचा ऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विविध मार्गावर शेड उभारणी करावी. तसेच पावसापासून बचावासाठी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वार ते इमारतीपर्यत शेड उभारावेत. अधिवेशन काळात येणा ऱ्या मान्यवरांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था विभागीय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. परंतु पावसाची परिस्थिती पाहता अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात यावी. पावसाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे किंवा वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. या घटनेपासून बचावासाठी विधिमंडळ परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. कळसे यांनी केल्या.पार्किंगची अतिरिक्त व्यवस्था कराअधिवेशन काळात सर्व मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, मोर्चेकरी, आंदोलनकारी यांच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर करण्यात यावी. शहर वाहतूक शाखा व पोलीस विभागाने समन्वय साधून अतिरिक्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. याशिवाय मुंबई मुख्यालयावरून येणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विभागाच्यावतीने अतिरिक्त बोगीची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना कळसे यांनी दिले.खासगी वाहनांची सेवावाहन व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले की, अधिवेशन कालखंडात २०० कार तसेच २०० जीप असे एकूण ४०० अतिरिक्त खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. मनुष्यबळाची संख्या अधिक असल्याने यावर्षी पहिल्यांदा ‘ग्रीन ओला’ अ‍ॅप बेस सर्व्हिसचा उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी ‘ओला’च्या १०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय १०० टॅक्सी देखील उपलब्ध राहणार आहेत. राज्यभरातून येणाऱ्यां ६२०० पोलीस अधिकारी व कर्मचा ऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था मंगल कार्यालये, सरपंच भवन अशा विविध ठिकाणी करण्यात आली आहे.विधिमंडळात २७१ दूरध्वनी संचविधिमंडळात २७१ दूरध्वनी संच लावण्यात येणार आहेत. याशिवाय एअर लाईनच्या माध्यमातून अतिरिक्त इंटरनेट सुविधा तसेच दूरध्वनी व्यवस्था करण्यात येणार आहे. विधिमंडळाचे कामकाज आॅनलाईन पद्धतीने चालणार असल्याने पावसाळ्यामुळे दूरध्वनी तसेच इंटरनेट सुविधेत कुठलाही अडथळा राहू नये यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर