शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विधी पत्रकारितेत परिश्रम आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:22 IST

अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देअजित गोगटे यांचे मत : लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. ते ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक असून सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत.विधी पत्रकारिता करण्यासाठी कायद्याची पदवी घेणे आवश्यक नाही. परंतु, हा थातूरमातूर करण्याचा विषयही नाही. त्यामध्ये सातत्य ठेवणे व प्राविण्य प्राप्त करणे गरजेचे आहे. आपल्याकडे दुर्दैवाने महाविद्यालयस्तरावर विधी पत्रकारितेचे धडे दिले जात नाही. त्यामुळे या क्षेत्रात थेट विहिरीत उडी घेऊन पोहणे शिकण्याची परिस्थिती आहे. हा विषय झटपट समजत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. विधी पत्रकारितेचा विषय आल्यास आजही बहुतेकजण हात वर करतात. आपल्याला यातील काहीच कळत नाही असे सांगून वेगळे होतात. त्यात बऱ्याचअंशी तथ्य आहे. असे आधीही होत होते. त्यामुळे वकिलांकडून बातम्या मागवल्या जात होत्या. परंतु, वकील हा वकीलच असतो. तो विद्वान असला म्हणजे चांगला पत्रकार होऊ शकतो असे म्हणता येत नाही. वाचकांना सोप्या व रंजक भाषेमध्ये बातम्या द्याव्या लागतात. हे कौशल्य केवळ चांगल्या पत्रकारांमध्येच असते असे गोगटे यांनी सांगितले.न्यायालयीन बातम्यांमध्ये अचूकता महत्त्वाची आहे. त्यात इकडे-तिकडे केल्यास न्यायालय अवमाननाची कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी सुरू असताना विधी पत्रकाराने न्यायालयात स्वत: हजर राहिले पाहिजे. बातमीसाठी वकिलांवर विसंबून राहणे बरेचदा घातक ठरते. वकील स्वत:च्या फायद्याची माहिती देत असतो. त्यातून परिपूर्ण बातमी करता येत नाही. न्यायालयांमध्ये नियमित घडामोडींशिवाय इतरही अनेक बातम्या असतात. त्या बातम्या मिळविण्यासाठी न्यायालयात फिरणे व न्यायालयात कार्यरत व्यक्तींचा विश्वास संपादित करणे आवश्यक असते. प्रत्येक नागरिकांना कायद्याचे ज्ञान रहात नाही. त्यामुळे नागरिकांना कायदेविषयक तरतुदींविषयी जागृत करणे ही सुद्धा विधी पत्रकारांची जबाबदारी असते. न्यायालयांचे निर्णय सखोल वाचणे व योग्य अर्थ समजून बातमी तयार करणे यात विधी पत्रकारांचा कस लागत असतो. बातमीचा हा प्रकार अनुभवातून शिकण्याची बाब आहे असेही गोगटे यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी विधी पत्रकारितेतील स्वत:च्या विविध अनुभवांची माहिती दिली.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर