शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी लाईट घोटाळा : उत्तर सादर करा अन्यथा विभागीय चौकशी, फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:24 IST

एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देनागपूर जि.प. प्रशासनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील ७५ सरपंच, सचिवांनी सीएसआर दरापेक्षा अधिक दराने एलईडी लाईटची खरेदी केली होती. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला होता. जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने ७५ सरपंच, सचिवावर घोटाळ्याचा व ७६ जणांवर अनियमिततेचा ठपका ठेवला होता. साडेनऊ लाखांची प्राथमिक वसुली दोषी सरपंच, सचिवांनी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा करण्याचेही निर्देशही दिले आहे़ ती जमा न केल्यास व जिल्हा परिषद कार्यवाही अधिनियम व संहिता धोरणाची अवहेलना म्हणून कारवाईत वाढ होण्याचेही प्रशासनाने स्पष्ट बजाविले आहे. या वर्षातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून याकडे पाहिले जाते़ पंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर यांच्या कार्यकाळात ६६ कोटींच्या घरात १४ व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाला़ ७६ व्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराच्या व्याप्ती व धोरणाचा अवलंब म्हणून हा निधी ग्रामपंचायतीच्या वित्तिय शिर्षावर थेट वर्ग करण्यात आला़ विकासकामांवर हा निधी ग्रामपंचायतीला खर्च करायचा होता़ सीएसआरपेक्षा अधिक दराने खरेदी करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही एलईडी लाईटवर ही रक्कम खर्च केली. हिंगणा, नागपूर ग्रामीण, नरखेड आणि काटोल तालुक्यातील ग्रामपंचायतींनी खरेदीच्या मर्यादा ओलाडल्या. शेवटी ही बाब जिल्हा परिषदेच्या आॅडिटमध्ये लक्षात आल्याने घोटाळ्याचे बिंंग फुटले़ त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ नवनियुक्त सीईओ संजय यादव आणि पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी घोटाळ्याच्या फाईलला गती देत कारवाईचे आदेश काढले़

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरCorruptionभ्रष्टाचार