शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

९९०० रुपयाच्या एलईडी लॅम्पची हायकोर्टाकडूनही दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:00 IST

महापालिकेने शहरातील रोडवर लावण्यासाठी चक्क ९९०० रुपये नगाप्रमाणे एलईडी लॅम्पस् खरेदी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही या व्यवहाराची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात शुक्रवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अमृता गुप्ता यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली व त्यांना नियमानुसार याचिका तयार करण्याचे निर्देश दिले. हा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देस्वत: दाखल केली याचिका : ‘लोकमत’ने लावून धरला होता विषय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील रोडवर लावण्यासाठी चक्क ९९०० रुपये नगाप्रमाणे एलईडी लॅम्पस् खरेदी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही या व्यवहाराची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात शुक्रवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अमृता गुप्ता यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली व त्यांना नियमानुसार याचिका तयार करण्याचे निर्देश दिले. हा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता हे येथे उल्लेखनीय.यापूर्वी याच विषयावर अ‍ॅड. अभियान बाराहाते यांनी अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयात यासंदर्भात एकूण दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांसोबत मिळून सार्वजनिक निधीच्या लुटीचा कट रचला. बाजारात अवघ्या ३४०० रुपये नगाप्रमाणे उपलब्ध असणारे स्ट्रीट एलईडी लॅम्पस् महापालिकेने चक्क ९९०० रुपये दराने खरेदी करण्याचा करार केला. असे १ लाख ३८ हजार एलईडी लॅम्पस् खरेदी केले जाणार असल्यामुळे हा तब्बल १०० कोटीवर रुपयांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे. या खरेदी व्यवहाराचा संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात यावा, मनपा खरेदी करणार असलेले एलईडी लॅम्पस् व बाजारात उपलब्ध असलेले एलईडी लॅम्पस् यांची गुणवत्ता व किमतीची तज्ज्ञांमार्फत तुलना करून अहवाल मागविण्यात यावा, मनपास एलईडी लॅम्पस् पुरविणाºया कंपनीला बिल अदा करण्यास मनाई करण्यात यावी व या गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती बाराहाते यांनी न्यायालयाला केली आहे. त्यांच्या याचिकेत महापालिका आयुक्त, महापौर, खरेदी समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल व नगरसेवक संदीप सहारे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे