शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:13 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तींकडून होणारे व्यभिचार-बलात्कार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष व भेदभावाच्या घटना वेदनादायी व चिंताजनक आहेत. यावर नियंत्रणसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपोलीस, सुरक्षा दलांसाठी योजना राबविण्याचा सल्ला : सीमा परिसरात रोजगारनिर्मिती व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा  बंदोबस्त झाला पाहिजे. कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तींकडून होणारे व्यभिचार-बलात्कार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष व भेदभावाच्या घटना वेदनादायी व चिंताजनक आहेत. यावर नियंत्रणसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.शेजारी देशांची शांतीपूर्वक संबंध बनविण्याचे प्रयत्न कायम ठेवण्यात आले. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात दृढतेने उभे राहून आपली भूमिका सेना, शासन व प्रशासनाने दाखवून दिली. सैन्य व सुरक्षादलांचे धैर्य वाढविणे, त्यांना संपन्न बनविणे, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे इत्यादी गोष्टींना प्रारंभ झाला व त्याचा वेग वाढतो आहे. सुरक्षादलांचे जवान व कुटुंबियांचे योगक्षेम कुशल रहावे यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. गृहमंत्रालय, सुरक्षा मंत्रालय, अर्थ मंत्रालय इत्यादी अनेक विभागांतून सुरक्षादलांशी संबंधित योजनांचा विचार व अंमलबजावणी होणे प्रशासकीय दृष्टीने आवश्यक आहे.अंदमान-निकोबार सह इतर बेटं संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यांच्यावर नजर तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेथील व्यवस्थेला बळ दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूमी तसेच सागरी सीमाक्षेत्रांत राहणाऱ्या बांधवांपर्यंत रोजगार, शिक्षण, आरोग्य इत्यादींची व्यवस्था पोहोचत राहीली पाहिजे यासाठी शासन व समाज या दोघांनीही प्रयत्न वाढविले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.पोलीसांचा अवस्था सुधारावीअंतर्गत सुरक्षेत पोलिसांची मौलिक भूमिका असते. त्यांच्या अवस्थेत सुधारणेची शिफारस पोलीस आयोगाने केली आहे. त्यावर विचार व सुधारणेच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गांसाठी बनलेल्या योजना योग्य पद्धतीने लागू व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाने अधिक तत्परता व पारर्शकता बाळगण्याची आवश्यकता आहे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.सुरक्षा उत्पादनांसंदर्भात आत्मनिर्भरता यावी‘राफेल’ कराराच्या वादावरुन राजकारण पेटले असताना सरसंघचालकांनी आत्मनिर्भरतेवर भर देण्याचा सल्ला दिला. सुरक्षा उत्पादनांबाबत संपूर्ण आत्मनिर्भरता साधल्याशिवाय देशाच्या सुरक्षेसंदर्भात आश्वस्त होऊ शकत नाही. या दिशेने देशाच्या प्रयत्नांचा वेग वाढवावा लागेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा