शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

दोन चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जन्मदात्रीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 22:07 IST

Nagpur News नागपूर रेल्वेस्थानकावर दोन लहान बहिणी बेवारस अवस्थेत फिरताना आढळून आल्या. या दोघींना त्यांची आई सोडून गेल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरून लक्षात आले.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकाच्या फलाटावर आढळल्या दोन बहिणी

नागपूर : दोन चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून त्यांची जन्मदात्री निघून गेली. अवघ्या दीड आणि तीन वर्षे वय असलेल्या या दोघी नीट बोलू शकत नाही अन् आईवडील अथवा ईतर नातेवाईकांबाबत माहितीही देऊ शकत नाही. मात्र, खुद्द आईच रेल्वेस्थानकावरच्या फलाटावर शोधून पळ काढल्याने त्या दोघी बहिणी कावऱ्याबावऱ्या झाल्या आहेत.

२६ मेच्या पहाटे १.३० वाजता दीड वर्षाची पिंकी, तसेच तीन वर्षांची कीर्ती येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सैरभैर अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना दिसल्या. सदस्यांनी त्यांच्या जवळ जाऊन आईवडिलांबाबत विचारणा केली असता त्या व्यवस्थित माहिती देऊ शकल्या नाही. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी त्यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात (जीआरपी) आणून सोडले. पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटावर या दोन मुलींच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांकडे विचारपूसही केली. मात्र, त्यांची माहिती पोलिसांना उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी नंतर फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली आणि ती कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना श्रद्धानंदपेठेतील खासगी बालगृहात दाखल केले.

पोटच्या मुलींना तिने असे बेवारस का सोडले ?

सीसीटीव्हीत दिसणारी महिला अत्यंत गरीब कुटुंबातील दिसते. रस्त्याच्या बाजुला फुटपाथवर अथवा अशाच कोणत्याही ठिकाणी ती राहत असावी, असा अंदाज प्राथमिक चाैकशीनंतर पोलिसांनी बांधला आहे. मात्र, तिने आपल्या पोटच्या मुलींना असे बेवारस का सोडले, ते स्पष्ट झाले नाही. ती हाती लागल्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. रेल्वे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी