शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेंच प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:48 IST

पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर पालकमंत्र्यांचे निर्देश : शेतकºयांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासाठी सुमारे १०० दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.पेंचच्या जलाशयात अत्यल्प जलसाठा आहे. रब्बीच्या पिकांसाठी मुबलक पाणी सोडले तर पुढे पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होईल, अशी परिस्थिती आहे. यामुळे शेतकºयांना रब्बी पिकासाठी पाणी मिळणार नाही, असे चित्र तयार झाले होते. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा लावून धरत पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. पेंच प्रकल्पाच्या लाभधारकांना रब्बी हंगामात एक पाळी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाºया शेतकºयांसाठी पेंच धरणाचे बिगर सिंचन कामे आरक्षण वगळता उर्वरित पाण्यातून रब्बी पिकांसाठी पाणी देण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार अंदाजे १०० दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत.रब्बी पिकांसाठी पाणी देण्यासंदर्भात आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर तसेच लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांनी पाठपुरावा केला होता. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच नागपूर महापालिकेने काटकसरीने वापर करून पाणी बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले आहे.