शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण सोडा, नाही तर युती तोडा!

By admin | Updated: July 15, 2014 01:07 IST

शिवसेनेचे पदाधिकारी भाजपला नेहमी ब्लॅकमेल करतात. निवडणुकीत गनिमीकावा करण्याचा प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीतही सेनेने भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

भाजप कोअर समितीची बैठक : सेनेवर रोखला बाण कमलेश वानखेडे - नागपूरशिवसेनेचे पदाधिकारी भाजपला नेहमी ब्लॅकमेल करतात. निवडणुकीत गनिमीकावा करण्याचा प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीतही सेनेने भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकदाची नागपुरात तरी शिवसेनेशी युती तोडा व दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपसाठीच मागा, अशी टोकाची भूमिका भाजप कोअर समितीच्या बैठकीत मांडण्यात आली.भाजपच्या कोअर समितीची जिल्हानिहाय बैठक सोमवारी रविभवनात झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, महापौर आ. अनिल सोले, महामंत्री सुधाकर कोहळे, प्रमोद पेंडके, राजेश बागडी, संजय भेंडे, श्रीकांत देशपांडे, डॉ. छोटू भोयर, कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, कीर्तीदा अजमेरा, बंटी कुकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या रणनीतीवर चर्चा करण्यापेक्षा शिवसेनेवर असलेली नाराजी व्यक्त करण्यावर अधिक भर देण्यात आला. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी याला सुरुवात केली. ते म्हणाले, शहरात भाजपची ताकद दाखविण्याची ही संधी आहे. शिवसेनेचे दबावतंत्र मोडित काढणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे लोक त्रास देतात. लोकसभा निवडणुकीतही सेनेमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला, अशी भावना त्यांनी मांडली. खोपडे यांनी मांडलेल्या मताचा धागा धरत दक्षिणच्या इच्छुकांनी शिवसेनेवरच बाण रोखला. डॉ. छोटू भोयर यांनी आक्रमक भूमिका घेत दक्षिणची जागा सेनेला सोडण्यास विरोध केला. ते म्हणाले, गडकरींच्या निवडणुकीत दक्षिण नागपुरातील एका बैठकीत प्रदेशाध्यक्ष आ. फडणवीस व शहर अध्यक्ष आ. खोपडे उपस्थित होते. या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी गडकरींना एक लाखावर मते मिळवून द्या, आम्ही दक्षिणची जागा मिळवून देतो, असे आश्वस्त केले होते. दक्षिणच्या भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एक लाखावर मतेही मिळाली. आता ते आश्वासन नेत्यांनी पूर्ण करावे, अशी भूमिका मांडली. शिवसेनेशी युती करायचीच असेल तर खोपडे यांनी आपली जागा सोडावी व दक्षिण सोडू नका, अशी आग्रही भूमिका भोयर यांनी मांडली. भोयर यांच्या मागणीला सुधाकर कोहळे यांनी पाठबळ दिले. दक्षिण नागपूर मिळत नसेल तर नागपुरात युती तोडा, अशी मागणी कोहळे यांनीही ताकदीने केली. बैठकीत शिवसेना विरोधी वातावरण तयार झाले असताना, भाजयुमोचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनीही सेनेवर नेम साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सेनेचे पदाधिकारी काँग्रेसच्या बुथवर बसले होते. उघडपणे भाजप विरोधात काम केले. आता आपण त्यांना मदत कशी करायची, असा सवाल त्यांनी केला. वातावरण तापलेले पाहून अशोक मेंढे यांनी संयमी भूमिका घेत उद्या बसपा काँग्रेससोबत गेली व आपली युती तुटली तर फटका बसेल, असे मत मांडले. महिला आघाडीच्या अध्यक्ष डॉ. कीर्तीदा अजमेरा यांनी किमान एका जागेवर तरी महिला उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली.