शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

नागपूरनजीकच्या रामटेक भागात बस उलटून २० विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:37 IST

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली एसटी बस रामटेक-मौदा मार्गावरील मौदा टी पॉर्इंट परिसरात उलटून २० विद्यार्थी जखमी झाले.

ठळक मुद्देचालक होता दारूच्या नशेतबस भरधाव

आॅनलाईन लोकमतनागपूर : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली एसटी बसचालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उलटली. त्यात २० विद्यार्थी जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघात होताच बसचालक बस सोडून पळून गेला. तो दारूच्या नशेत असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. ही घटना रामटेक-मौदा मार्गावरील मौदा टी पॉर्इंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली.जखमींमध्ये श्रृतिका शेंडे (१७), आयुष लेंडे (१२), कुणाल खोडणकर (१८), सोनिया मेश्राम (१४), नीतेश पालवे (१२), आश्लेषा कडू (११), आशू वैद्य (११), देवयानी कारामोरे (१३), बाली गुरनुले (१३), वैष्णवी पालवे (१३), दयावंती उके, उज्ज्वला मनघाटे यांच्यासह अन्य आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाहीत.नगरधन, नेरला, चाचेर, तारसा यासह परिसरातील गावांमधील विद्यार्थी रामटेक येथे शिकायला येत असून, ते रोज बसने ये जा करतात. ही सर्व गावे रामटेक - मौदा मार्गावर असून, या मार्गावर बसेसची संख्या कमी आहे. शिवाय, रामटेक आगाराच्या बहुतांश बसेस वेळेवर सोडल्या जात नाही. शाळा सुटल्यानंतर ही सर्व मुले बसची प्रतीक्षा करीत बसस्थानकात बसली होती. तासभरानंतरही बस न लागल्याने आगार व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी एमएच-०७/सी-७५१८ क्रमांकाची ज्यादा बस रामटेक - मौदा मार्गावरील नेरल्यापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली. संजय चहांदे हा त्या बसचा चालक तर नितीन माकडे हा वाहक होता.या बसमध्ये ५० च्या आसपास विद्यार्थी व काही प्रवासी होते. ही बस सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मौदा टी पॉर्इंटपासून पुढच्या प्रवासाला निघाली. काही अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि बस रोडच्या कडेला उलटली. त्यात २० विद्यार्थी जखमी झाले. बसचालक संजय चहांदे हा दारू प्यायला असल्याचे विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सांगितले. अपघात होताच त्याने बस सोडून पळ काढला.माहिती मिळताच पोलिसांसह शिक्षक व नागरिकांनी घटनास्थळ गाठून सर्व विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले आणि जखमींना लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. यात काही विद्यार्थ्यांचे हात व पाय फ्रॅक्चर झाले असून, काहींना मुका मार लागला. दुसरीकडे, रामटेक आगाराच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात