शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत शिका सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:29 IST

उपराजधानीतील वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे‘आयडीटीआर’च्या जागेला हिरवी झेंडीगोधनी येथे २० एकर जागा देण्यास राज्य शासनाने दिली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘आयडीटीआर’साठी (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च) जागा देण्यास राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. गोधनी येथे २० एकर जागेमध्ये ही संस्था उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ही संस्था येथे येणार आहे. ‘आयडीटीआर’च्या माध्यमातून मंत्रालयाच्या सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’च्या मोहिमेला ‘बूस्ट’ मिळणार आहे.केंद्र शासनाच्या भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट’अंतर्गत नागपुरात ही संस्था स्थापन करण्यात येत आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी नागपुरात विविध जागांची चाचपणी करण्यात आली होती व अखेर गोधनी येथील २० एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व ही जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा ‘आयडीटीआर’ला ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.‘आयडीटीआर’मध्ये महिन्याला ३०० वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येथे वाहतूक प्रशिक्षणासंदर्भात अत्याधुनिक व्यवस्था राहणार आहे. यात ऑडिओ-व्हिज्युअल सुविधेसह ‘ड्रायव्हिंग लेबॉरेटरी’चा समावेश असेल. येथे ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स’देखील असतील.

सुरक्षित वाहने चालविण्याचा येईल आत्मविश्वासचारचाकी वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स असूनही मुख्य रस्त्यांवर व वाहतुकीच्या वर्दळीत वाहन चालविण्याचा आत्मविश्वास अनेकांकडे नसतो. अशा व्यक्तींना योग्य प्रशिक्षण मिळावे व त्यांना आत्मविश्वास यावा यासाठी ‘आयडीटीआर’ची मौलिक भूमिका राहणार आहे. ‘आयडीटीआर’च्या ट्रॅकवर सफाईदारपणे गाडी चालविली म्हणजे मुख्य रस्त्यांवर व गर्दीतही सहज गाडी चालविता येईल, असा विश्वास वाहन चालकांना वाटतो. पुण्यातील भोसरी येथे अनेक वाहनचालक प्रशिक्षणासाठी येतात. नागपुरातदेखील आता वाहनचालकांसाठी असा पर्याय उपलब्ध होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना चारचाकी वाहनांच्या पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी पुण्यातील ‘आयडीटीआर’ला जावे लागते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस