‘सुंदर मेरा घर’: रिन आणि लोकमत सखी मंचचे ९ रोजी आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले घर सुंदर बनविण्यासाठी सर्व महिला परिश्रम घेतात. आपले हक्काचे घर आकर्षक, टापटिप असावे अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. परंतु घर कसे सुंदर बनवावे याबद्दल सर्वांच्या मनाला प्रश्न पडतो. गृहिणींना या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी रिन आणि लोकमत सखी मंचच्यावतीने ‘सुंदर मेरा घर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विविध सोशल मीडियावर वेगवेगळ्या साईट, विविध पुस्तके, मासिक पत्रिकांमध्ये घर सजविण्याचे उपाय सांगितले जातात. परंतु हे उपाय अतिशय खर्चिक असतात. घराची तोडफोड न करता कमीतकमी खर्चात घर जसे आहे त्याच अवस्थेत ते अधिक सुंदर कसे करावे, याबाबत प्रसिद्ध इंटेरियर डेकोरेटर सखींना मार्गदर्शन करणार आहेत. घरात केलेले छोटे छोटे बदल घर सुशोभित करण्यासाठी किती महत्त्वपूर्ण ठरतात, ही बाब गृहिणींना या कार्यक्रमातून चांगल्या पद्धतीने समजणार आहे. हा कार्यक्रम ९ जूनला रामगोपाल माहेश्वरी भवन, झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे दुपारी १ वाजता होणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे मुख्य आकर्षणमराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे या कार्यक्रमातील आकर्षण राहणार आहे. ती या कार्यक्रमात सखींसोबत चर्चा करणार आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या चित्रपटातील अभिनय आणि जीवनाबाबत चर्चा करता येणार आहे.रिन आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमाने ‘जल समृद्ध महाराष्ट्र’ बनविण्यासाठी जलसंवर्धन उपक्रम कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘सुंदर मेरा घर’ या कार्यक्रमांतर्गत एक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात पाणी बचत किंवा जलसंवर्धन या विषयावर एक संदेश किंवा पोस्टर तयार करावे लागणार आहे.हा संदेश किंवा पोस्टर घरून तयार करून स्पर्धकांना कार्यक्रमाला यावयाचे आहे. उत्कृष्ट संदेश किंवा पोस्टर तयार करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार देण्यात येतील. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, यात लोकमत कॅम्पस क्लब आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, सखींसाठी एक मिनिट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सखींना आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९८५०३०४०३७, ९९२२९६६५२६, ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जाणून घ्या सुंदर घर बनविण्याचा मार्ग
By admin | Updated: June 6, 2017 02:07 IST