लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानात मंगळवारी सकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तारकुंडे शाळेत मतदान केले.नागपूर पदवीधर मतदार संघात सकाळी ८ ते १० या दोन तासात ग्रामीण भागात ८.८८ टक्के मतदान झाले.रवीनगर येथील दादाजी धुनिवाले मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. तसेच पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला.प्रा अनिल सोले माजी विधानपरिषद सदस्य यांनी बूथ क्र 89 मॉडर्न हायस्कूल नीरी लक्ष्मीनगर येथे मतदान केले या प्रसंगी नितिन पंडे, विजय फडणवीस, शैलेश ढोबळे उपस्थित होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:31 IST