शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

उपराजधानीचे आकर्षण ठरणार लक्ष्मीनगरचा दुर्गा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:43 AM

लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे दुर्गोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, ‘माझी मेट्रो’ची प्रतिकृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे दुर्गोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल असणाºया या आयोजनाला ‘लोकमत’चेही सहकार्य लाभले आहे. लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल मैदानावर आयोजित हा मध्य भारतातील सर्वात मोठा दुर्गोत्सव राहणार असून याला आधुनिक ‘टच’ देण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा येथे ‘मेट्रो’ची प्रतिकृती साकारण्यात येणार असून नागरिकांना प्रत्यक्ष ‘मेट्रो’त बसल्याचाअनुभव येथे घेता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न मोहिले यांनी दिली.राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे सोमवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाद्वारे दरवर्षी लक्ष्मीनगरमध्ये भव्य आयोजन करण्यात येते. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही मंडळाद्वारे करण्यात येते. यावर्षी मंडळाने भव्यदिव्य आयोजनाचा निर्णय घेतला आहे.राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे बारावे वर्ष आहे. मंडळाद्वारे साकारण्यात येणाºया दुर्गेच्या मूर्तीची निर्मिती गंगा नदीच्या मातीतून करण्यात येत आहे. मूर्ती बनविणारे कलावंत खास कोलकाता येथून बोलाविण्यात आले आहे. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’ समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत घटस्थापना होईल. दुर्गोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांत नागरिकांना मोफत प्रवेश असेल असे मोहिले यांनी सांगितले.पत्रपरिषदेला सचिव आनंद कजगीकर, उपाध्यक्ष शशांक चोबे, वैभव गांजापुरे, अमोल जोशी, वैभव पुणतांबेकर, कोषाध्यक्ष अमोल अन्वीकर, संस्थापक सदस्य समृद्धी पुणतांबेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.मंडळाचे सामाजिक कार्यराणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. वृद्धाश्रम, अनाथालय यांना मदत करण्यात येते. मनपाच्या २५ शाळा मंडळातर्फे डिजिटल करण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाला १७०० तर रेल्वेत खलासी काम करणाºया कर्मचाºयांना १५० रेनकोटचे वितरण करण्यात आले आहे.

‘मेट्रो’चा वातानुकूलित अनुभवआयोजन स्थळावर ‘माझी मेट्रो’ या संकल्पनेवर स्वयंचलित मेट्रोची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. येणाºया भाविकांना भविष्यात शहरात धावणाºया ‘मेट्रो’चे ‘फिल’ येथे अनुभवायला मिळणार आहे. येथे अगदी खºयाखुºया ‘मेट्रो’प्रमाणे ‘अनाऊन्सेन्ट’ प्रणाली, एलईडी स्क्रीन इतकेच काय तर ‘एसी’चीदेखील व्यवस्था राहणार आहे. सोबतच परिसरात ‘आयफेल टॉवर’ची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार आणि ‘थ्रीडी लाईट्स’ची रोषणाई राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात येणार आहेत.अनुभवा भगतसिंगांचा धगधगता चित्रप्रवासत्याचबरोबर क्रांतिकारी भगतसिंग यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजनस्थळी लावण्यात येणार आहे. यासाठी मंडळाने खास पंजाबमधून भगतसिंग यांची दुर्मिळ छायाचित्रे आणली आहेत. पंजाबमधील खटकडकलान येथील भगतसिंग संग्रहालयातून माहिती गोळा करण्यात आली आहे. १८५७ पासूनचा इतिहास १२५ चित्रांतून साकारण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव आनंद कजगीकर यांनी दिली.असे आहेत कार्यक्रमतारीख वेळ कार्यक्रम२२ सप्टेंबर सायं ७ वा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावरील चित्रपट२३ सप्टेंबर सायं. ७ वा. ‘नृत्य स्वरूप-संत ज्ञानेश्वर’ कलाविष्कार,सोनिया परचुरे आणि चमू२४ सप्टेंबर सायं. ७ वा. ‘सावनी अनप्लग्ड’-सावनी रवींद्र यांचा ‘कॉन्सर्ट’२५ सप्टेंबर सायं. ७ वा. सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारीविजय रामन यांची मुलाखत२६ सप्टेंबर सायं ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम२७ सप्टेंबर सायं ७ वा. ‘प्रतापसूर्य बाजीराव’ कथाकथन,राहुल सोलापूरकर यांचे सादरीकरण२८ सप्टेंबर सायं ७ वा. भजनसंध्या, अनुप जलोटा यांचे सादरीकरण२९ सप्टेंबर सायं ७ वा. महागरबा३० सप्टेंबर सायं ७ वा. दसरामिलन