शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधामध्ये शिथिलता; पण नियम पाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन : जबाबदारी ओळखून वागा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ...

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन : जबाबदारी ओळखून वागा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे नागपूर शहरात लागू असलेल्या निर्बंधामध्ये १ जूनपासून १५ जूनपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सुरक्षेची काळजी घेत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे.

.......

दुकानातील कर्मचाऱ्यांनी चाचणी करावी

जीवनावश्यक वस्तू व नवीन आदेशात परवानगी देण्यात आलेल्या वस्तूंची दुकाने सुरू करताना दुकानातील सर्व कर्मचारी, कामगार यासह ऑनलाईन अन्न तसेच अन्य साहित्यांचा पुरवठा करणारे डिलिव्हरी बॉय या सर्वांची मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रामध्ये नि:शुल्क आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन राधकृष्ण बी यांनी केले आहे.

....

नागपुरात १ ते १५ जून २०२१ पर्यंत काय सुरू आणि काय बंद राहील याची माहिती

काय सुरू राहील? (प्रतिष्ठाने व सेवा) सुरू राहण्याची वेळ

वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्ससुरू राहतील

वृत्तपत्र, मीडियासंदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे) सुरू राहतील

पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सुरू राहतील

सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा ऑटोरिक्षा (चालक दोन प्रवासी)

टॅक्सी (चालक ५० टक्के प्रवासी क्षमता)

बस (प्रवासी क्षमतेनुसार) उभे प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही

माल वाहतूक सेवासुरू राहतील

उद्योग, कारखाने सुरू राहतील

बांधकामे (फक्त साईटवरच लेबर उपलब्ध असल्यास) सुरू राहतील

बँक व पोस्ट सेवा सुरू राहतील

कोरोनाविषयक लसीकरण सेवा व चाचणी केंद्रे सुरू राहतील

किराणा दुकाने, बेकरी दुकानसकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

दूध विक्री, फळे विक्री व पुरवठासकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

भाजीपाला विक्री व पुरवठासकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

चिकन, मटन, अंडी व मांस दुकानेसकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

पशुखाद्य दुकानेसकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

ऑप्टीकल्स दुकानेसकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

खते व बी-बियाणे दुकानेसकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

निवासाकरिता असलेले हॉटेल, लॉजेस (५० टक्के क्षमतेने) फक्त हॉटेलमध्ये निवासी असलेल्या ग्राहकांसाठीच किचन सुरू ठेवता येईल.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ (घरपोच सेवा) सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत

बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत (स्टॅण्ड अलोन) एकल दुकाने (शॉपिंग सेंटर व मॉलमधील दुकाने वगळून) (शनिवार व रविवार बंद)सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

अ‍ॅडव्होकेट व चार्टर्ड अकाऊंटंट खासगी कार्यालय २५ टक्के किंवा ५ च्या क्षमतेने

शासकीय कार्यालये (कोरोनाविषयक कामे नसलेली) २५ टक्के क्षमतेने

मद्य विक्रीफक्त होम डिलिव्हरी

लग्नसमारंभ २५ टक्के लोकांच्या मर्यादेत, समारंभ फक्त दोन तासांकरिता

...

पूर्णपणे बंद असलेल्या आस्थापना

• सलून

• स्पा

• ब्युटी पार्लर

• जिम्नॅशियम

• शाळा/कॉलेज, कोचिंग क्लासेस

• उद्याने

• स्विमिंग पूल

• सिनेमा हॉल

• नाट्यगृह