शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वकील महिलेची तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:25 IST

हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या एका वकील महिलेने घरगुती वादातून पतीसमोरच तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वीच झाला वास्तुपूजनाचा कार्यक्रम : हुडकेश्वर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या एका वकील महिलेने घरगुती वादातून पतीसमोरच तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप तसेच उलटसुलट चर्चा होत असल्यामुळे गुन्ह्याचे स्वरूप ठरविण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वृत्त लिहिस्तोवर चर्चा करीत होेते.हुडकेश्वरमधील आनंदविहार कॉलनीमध्ये राहणाºया सोनाली यांचे माहेर मुंबईला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. त्यांना जुळी मुले (मुलगा, मुलगी) आहेत. त्या स्वत: आणि त्यांचे पती अमरदीप रंगारी वकील आहेत. मुले झाल्यानंतर सोनाली यांनी न्यायालयात जाणे बंद केले. दरम्यान, पती अमरदीप रंगारी अलीकडे आपल्याकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्याची भावना सोनालीची झाली होती. त्यावरून पती-पत्नीत खटके उडायचे. त्यांनी आनंद विहार कॉलनीत घेतलेल्या सदनिकेचे दोन दिवसांपूर्वीच वास्तुपूजन केले होते. अनेक नातेवाईक या कार्यक्रमाला आले होते. त्यातील काही मुक्कामीही होते. नातेवाईकांसमोरच पती-पत्नीमधील विसंवाद उघड झाला होता. या पार्श्वभूमीवर, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनाली आणि त्यांचे पती अमरदीप सदनिकेच्या गॅलरीत चर्चा करीत होते. या चर्चेला वादाचे स्वरूप आले. मोठमोठ्याने बोलणे सुरू असताना सोनाली यांनी तिसºया माळयावरून उडी मारली. जोरदार किंकाळी ऐकू आल्याने नातेवाईक तसेच शेजारी धावले. त्यांनी सोनालींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेची माहिती कळताच हुडकेश्वरचे पोलीस अधिकारी तसेच सहायक पोलीस आयुक्त आनंद विहार कॉलनीकडे धावले. नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांनीही घटनेची माहिती जाणून घेतली. सोनाली यांचे माहेर मुंबईचे आहे. माहेरची मंडळी पोहचण्याला उशीर झाल्यामुळे तसेच प्रकरण संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी तपासाची पुढील प्रक्रिया थांबवली. सोनालीची माहेरची मंडळी आल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवू, असे हुडकेश्वर पोलीस सांगत होते. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

... अन्यथा भावाकडे जाईल !पोलिसांच्या माहितीनुसार, सोनाली पतीपासून दुखावल्या होत्या. पतीने मनासारखे वागावे, असा त्यांचा आग्रह होता. त्या त्यांना वारंवार भावाकडे निघून जाईल, असे म्हणत होत्या. सोनालीच्या भावाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजते. सोनालीचा तो इशारा सरळ सरळ आत्मघाताचा होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे दोन चिमुकल्यांची मायेची उब कायमची हिरावली गेली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याadvocateवकिल