शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मानवी तस्करीस मदत करणाऱ्या वकिलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 22:54 IST

मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे.

ठळक मुद्देगुप्तचर संस्था सक्रिय : आरोपी लपवीत आहे खरी माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे.या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने, पोलिसांनाही खरी माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी १० दाम्पत्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि पासपोर्ट अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २३ जानेवारी रोजी बलबीरसिंह मुलतानी (६५), अजितसिंह मुलतानी (६२), मंजितसिंह गोत्रा (६०) आणि रुल्डासिंह गुज्जर (६१) यांना अटक केली आहे. रुल्डासिंह गुज्जर याने सर्वाधिक १९ युवकांना ब्रिटनला पाठविले होते. यात त्याच्या मुलाचाही समावेश आहे. रुल्डासिंहने पोलिसांना वकील राठोड याने बोगस दस्तावेज बनवून दिल्याचे सांगितले. या आधारावर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा राठोडला अटक केली.सूत्रानुसार राठोडला सप्टेंबर २०१७ मध्येसुद्धा प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपात अटक केली होती. बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून वाहन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्याला राठोडनेच दस्तावेज बनवून दिले होते. त्यानी रुल्डासिंहलासुद्धा पाच वर्षांपूर्वी बोगस बोनाफाईड सर्टिफिकेट बनवून दिले होते. या माध्यमातूनच तो युवकांना ब्रिटनला पाठवीत होता. पोलिसांनी राठोडला अटक करून बुधवारी न्यायालयासमोर सादर करून, दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आहे. रुल्डासिंहने सर्वाधिक युवकांना ब्रिटनमध्ये पाठविल्याने तो पोलिसांच्या मुख्य टार्गेटवर आहे. पैशाचे आमिष दाखवून युवकांना मजुरी करण्यासाठी ब्रिटनला पाठवत असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. इतर आरोपी मात्र समाधानकारक उत्तरे देत नाही. ते खरी माहिती लपवीत आहेत.नागपूर पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करताच पंजाब, हरियाणा आणि इतर दुसºया राज्यातील पोलिसही सक्रिय झाले आहेत. इतर राज्यातील युवकांनासुद्धा मानवी तस्करीच्या माध्यमातून ब्रिटन व युरोपीय देशांमध्ये पाठविण्यात आले आहे. मानवी तस्करी हे प्रकरण विदेशाशी जुळलेले आहे. त्यामुळे याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची गरज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा यासंदर्भात विचार करीत आहेत. गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा पोलिसांकडून याबाबतची माहिती मागविली आहे.

टॅग्स :advocateवकिलArrestअटक