शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाला मारहाण अन धमकी, बोगस पत्रकार मुन्ना पटेल अटकेत

By योगेश पांडे | Updated: March 12, 2024 22:51 IST

मुन्ना पटेल हा स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो व खंडणीवसुली, धमकीची कामे करतो.

नागपूर : विविध गुन्ह्यांत सहभागी असणारा बोगस पत्रकार मुन्ना पटेल उर्फ मुश्ताक खान याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याने एका वकिलाला मारहाण करत त्याच्याजवळची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. तसेच धमकीदेखील दिली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मुन्ना पटेल हा स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो व खंडणीवसुली, धमकीची कामे करतो. त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सोमवारी दुपारी त्याने ॲड.शाहबाज सिद्दीकी उर्फ अबरार सिद्दीकी (४२, जाफरनगर) यांना धमकी दिली. ते जिल्हा व सत्र न्यायालयाजवळील एका चहाच्या टपरीवर उभे होते. त्यावेळी मुन्ना पटेल तेथे पोहोचला. तू माझ्याविरोधात पोलिसांत खूप तक्रारी केल्या असून त्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर माझा खूप खर्च झाला असून ते पैसे तुझ्याकडूनच वसूल करेन, असे त्याने म्हटले. ॲड सिद्दीकी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर मुन्नाने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावली. त्याने खिशातून ब्लेडसारखी वस्तू काढत त्याने सिद्दीकी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. इतर वकिलांनी तेथे येऊन मुन्नाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फरार झाला. यात सिद्दीकी यांच्या गळ्याजवळ जखम झाली. त्यांनी मेयो इस्पितळात जात उपचार घेतले व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुन्नाला अटक केली आहे. या घटनेमुळे वकिलांमध्येही संतापाचे वातावरण आहे.

अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडून उकळले पैसेमुन्नाची सरकारी कार्यालयात दहशत आहे. पत्रकार असल्याचे भासवून तो पैसे उकळतो. पैसे न दिल्याने त्याने केबिनमध्ये घुसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी त्याला अनेक महिन्यांनी अटक करण्यात आली होती. याआधीही तो वॉकर स्ट्रीटवर महिलांच्या आक्षेपार्ह क्लिपिंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आला होता. हॉटेल, रेस्टॉरेंट आणि बारचालकांकडूनही तो पैसे उकळतो. पैसे न दिल्यास बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देतो. त्याच्या भीतीमुळे अनेक पिडीत तक्रार दाखल करण्यास समोर येत नाही.

बोगस पत्रकारांची लगेच तक्रार कराशहरात मुन्नासारखे इतरही अनेक बोगस पत्रकार आहेत. ते कुठल्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, पोर्टल किंवा मासिकाचे पत्रकार नसतानादेखील बोगस आयकार्ड घालून शहरात फिरत असतात. पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बाजारपेठा, व्यापारी यांच्याकडे जाऊन बदनामीची धमकी देत पैसे वसूल करतात. काही जण तर अक्षरश: टोळीप्रमाणे काम करतात. अशा बोगस खंडणीखोर पत्रकारांची तातडीने तक्रार करण्याचे आवाहन पोलीस विभागो केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर