शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘चला नागपूर’ उपक्रमाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:46 IST

महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’उपक्रमाचा गुरुवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शहरी विकास मंत्रालयातर्फे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्ताने पब्लिक ‘आऊटरिच डे’ संकल्पनेंतर्गत दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत जपानी गार्डन येथे सकाळी महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉनला सुरुवात केली.

ठळक मुद्देमनपा, महा मेट्रो व जीआयझेड इंडियाचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’उपक्रमाचा गुरुवारी महापौरनंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शहरी विकास मंत्रालयातर्फे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्ताने पब्लिक ‘आऊटरिच डे’ संकल्पनेंतर्गत दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत जपानी गार्डन येथे सकाळी महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉनला सुरुवात केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपअभियंता राजेश दुपारे, जीआयजी स्मार्ट-एसयूटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर सारा हॅबरसॅक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा. या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत सेमिनरी हिल्स येथील वॉकर्स स्ट्रीट येथे सकाळी विविध फिटनेससंबंधी खेळ, झुम्बा डान्स व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. रामगिरी मार्गावर दिवसभर ग्रीन स्ट्रीट कार्निव्हलमध्ये नागरिकांना नागरी वाहतूक प्रकल्पाची माहिती देण्यात आली. याशिवाय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी)चे प्रवेशद्वार व श्रद्धानंदपेठ चौकात पॉप अप पार्क ची संकल्पना राबविण्यात आली. यावेळी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना सायलिंगचे महत्त्व पटवून देण्यात आले व नागरिकांना सायकल चालविण्याची शपथ देण्यात आली.वॉकथॉनमधील विजेत्यांचा गौरवजपानी गार्डन येथून प्रारंभ झालेल्या २ किमी अंतराच्या वॉकथॉनमध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जपानी गार्डन येथून सुरू झालेली शर्यत उच्च न्यायालय, शासकीय डाक कार्यालय, वॉकर्स स्ट्रीट मार्गे पुन्हा जपानी गार्डन येथे वॉकथॉनचे समापन झाले. यामध्ये सुंदर बोपवानी व डॉ. दीपा ठाकूर यांनी सर्वात कमी वेळ नोंदवून संयुक्तपणे प्रथम स्थान पटकाविले. तर आर्की. रिना शाह व पूजा बजाज यांनी दुसरे व तिसरे स्थान राखले. सर्व विजेत्यांना महापौरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम सायंकाळी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये पार पडला.

टॅग्स :MayorमहापौरNanda Jichakarनंदा जिचकार