शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चिनी वस्तूंच्या बहिष्काराच्या राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:50 IST

चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे‘कॅट’तर्फे आयात कमी करण्याचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.डिसेंबर २०२१ पर्यंत चीनमध्ये निर्मित वस्तूंची भारतात आयात १ लाख कोटींनी कमी करण्याचे ‘कॅट’चे लक्ष्य आहे. ‘कॅट’चे अभियान पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाला यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात पूर्वीपासून उत्पादन होणाऱ्या ३ हजार वस्तूंची यादी कॅटने तयार केली असून या वस्तूंची आयात चीनमधून कशी थांबेल, यावर जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत देशातील व्यापारी आणि लोकांना जागरूक करून भारतीय उत्पादनांची खरेदी-विक्री करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले. चीनमधून भारतात चार प्रकारच्या वस्तू आयात होतात. त्यामध्ये तयार माल, कच्चा माल, स्पेअर पार्ट आणि तांत्रिकी उत्पादने आहेत. या वस्तूंची विक्री कमी कशी होईल, यावर भर राहणार आहे. देशातील व्यापारी स्वदेशीचा संदेश देणारे मास्क घालून अभियानाचा प्रसार करणार आहेत तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत सर्व राजधानी आणि शताब्दी रेल्वेत जवळपास ५ कोटी ग्लास कॅटरिंगमध्ये वितरित करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात कॅटचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये देशातील विविध संघटना आणि संस्थांना जोडण्यात येणार आहे.कॅट गेल्या चार वर्षांपासून चिनी उत्पादनांच्या बहिष्कारासाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहे. त्याच कारणाने आणि सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे वर्ष २०१८ ते आतापर्यंत चीनच्या आयातीत ६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. चिनी वस्तूंच्या बहिष्कारावर भारतीय नेहमीच शंका उपस्थित करतात, पण भारतीय लोकांसोबतच हा संकल्प तडीस नेण्याचा कॅटचा प्रयत्न असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chinaचीनnagpurनागपूर