शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

फ्लाय अ‍ॅश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:51 IST

फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कोराडी व खापरखेडा येथे देशातील पहिल्या फ्लाय अ‍ॅश क्लस्टरचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. डिसेंबरअखेर कोराडी व खापरखेडा येथील फ्लास अ‍ॅश क्लस्टरची उभारणी पूर्ण करून या अंतर्गतच्या उद्योगाद्वारे रोजगार निर्मितीस चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.वारेगाव (खापरखेडा) येथील फ्लाय अ‍ॅश इंडस्ट्रीयल क्लस्टर तथा फ्लाय अ‍ॅश इनक्युबेशन, संशोधन व कौशल्य विकास केंद्र (कोराडी) याचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, संतोष आंबेरकर, कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे, कैलास चिरुटकर, अनिल नंदनवार, राजू बुरडे, संचालक सुधीर पालीवाल, अनिल पालमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण माथुरकर, खैरीच्या सरपंच कविता आदमने, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, खापरखेड्याच्या सरपंच अनिता मुरोडिया, पोटा-चनकापूरचे सरपंच ढगे, कोराडीच्या उपसरपंच अर्चना दिवाने, कोराडी महादुला नगर पंचायतच्या अध्यक्ष सीमा जयस्वाल आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, फ्लाय अ‍ॅशच्या वापरासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र स्तरावरही गौरविले गेले असून हे धोरण देशातही राबविण्यात येणार आहे. फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावणे तसेच फ्लाय अ‍ॅश क्लस्टरमधील उद्योंगाद्वारे रोजगार निर्मिती करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. ‘महाजेनको’ने त्यांच्याकडील उपलब्ध जागेचा परिपूर्ण उपयोग करत व्यावसायिक प्रकल्पांना चालना द्यावी. परिसरात वृक्षारोपणांतर्गत पाच लाख झाडे लावावीत. तसेच बांबू उद्यानाची निर्मिती करावी. राखेची उपयोगिता वाढविण्यासाठी सिमेंट कंपन्यांबरोबर करार करावे. या प्रकल्पांतर्गत उद्योगांना स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.‘महाजेम्स’चे व्यस्थापकीय संचालक श्याम वर्धने म्हणाले, फ्लाय अ‍ॅशवर आधारित उद्योगांसाठी कोराडी व खापरखेडा येथे क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच क्लस्टर ठरणार आहे. फ्लाय अ‍ॅशच्या पूर्ण वापरावर भर देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले असून बांधकामासाठीही फ्लाय अ‍ॅशचा वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी केले. आभार मुख्य अभियंता अभय हरणे यांनी मानले.