शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलत आहे हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:48 IST

अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहºयावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ७१ लाख रुपयांचे ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या यंत्रावरील उपचाराचे दर निश्चित झाले नव्हते, तब्बल आठ महिन्यानंतर शासनाने आता दर निश्चित करून दिल्याने अत्याधुनिक उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देशासकीय दंत रुग्णालय : कृत्रिम दात तयार करणारे ‘कॅडकॅम’चे दर निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहºयावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ७१ लाख रुपयांचे ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या यंत्रावरील उपचाराचे दर निश्चित झाले नव्हते, तब्बल आठ महिन्यानंतर शासनाने आता दर निश्चित करून दिल्याने अत्याधुनिक उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील रुग्णांसाठी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. दातांच्या वाढत्या समस्या, वेडेवाकडे निघालेले दात, दात पडल्यानंतर कृत्रिम दातांचा वापर आदी समस्यांवर मात करण्यासाठी दंत रुग्णालयात अत्याधुनिक ‘कॅडकॅम’ यंत्राची गरज होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने या यंत्राच्या खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु, निधीअभावी वा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव शासनदरबारी पडून होता. दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडे (डीपीसी) विकास कामे व यंत्र खरेदीसाठी निधीचा प्रस्ताव दंत प्रशासनाकडून पाठविला जात होता. २०१६-१७ मध्येही हा प्रस्ताव पाठविण्यात आला. या यंत्रासाठी ‘डीपीसी’ने १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानेही याला परवानगी देताच खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन हे उपकरण ११ मे २०१७ रोजी रुग्णालयात दाखल झाले. परंतु, या यंत्रावर होणाºया विविध उपचाराचे दर शासनाकडून ठरविण्यात आले नव्हते. परिणामी, प्रत्यक्ष लाभापासून रुग्ण वंचित होते. दरम्यान, शुल्क ठरविण्याबाबत अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी स्वत:हून पाठपुरावा केल्याने शासनाने अखेर नवे दरपत्रक लागू केले.‘कॅडकॅम’वर होणारे प्रकार१) अ‍ॅक्रॅलिक क्रोन२) मेटल क्रोन३) आॅल सेरामिक क्रोन४) आॅल सेरामिक क्रोन (लि.)५) मेटल बार मिलिंग६) कस्टमाईज्ड इम्प्लांट७) झिरकोनिया क्रोन८) कास्ट पार्टिअल डेंन्चर९) कम्प्लेंट डेंचर प्रोस्थिसीस २००० रु.रोज चार रुग्णांवर अत्याधुनिक उपचार शासकीय दंत रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना ‘कॅडकॅम’ची मोठी मदत मिळत आहे. तुर्तास चार रुग्णांना याचा लाभ मिळत असलातरी भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दात गमावून बसलेल्यांसाठी हे उपकरण एक वरदान ठरत असून कृत्रिम दात बसविल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू समाधान देणारे आहे.डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

 

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य