शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी रुग्णाला लाभली ओळख  :  नागपूरच्या  मेडिकलमध्ये अडीच महिने उपचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:32 IST

समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळखी रुग्ण ओळखीचा झाला. आता लवकरच त्यांची आप्तांशी भेट होणार आहे.

ठळक मुद्देसमाजसेवा अधीक्षकांचा माणुसकीचा परिचय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने एका अज्ञात रुग्णाला मेडिकलमध्ये आणून सोडले. गंभीर अवस्थेमुळे ओळख पटविणे अशक्य झाले होते. रुग्णाजवळ कोणी नव्हते. समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळखी रुग्ण ओळखीचा झाला. आता लवकरच त्यांची आप्तांशी भेट होणार आहे.अविनाश रहांगडाले (५५) (नाव बदलले आहे) रा. यवतमाळ असे अनोळखी रुग्णाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथे गाई चारण्यावरून रहांगडाले व एका अज्ञात व्यक्तीमध्ये ५ डिसेंबर २०१७ रोजी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात अनोळखी इसमाने रहांगडालेंना प्रचंड मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत रहांगडाले यांना घटनास्थळीच सोडून आरोपी पळून गेला. जागरूक नागरिकाने ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला याची माहिती दिली. रुग्णवाहिकेने नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांना आणून सोडले. त्यावेळी त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. मेडिकलमधील समाजसेवा अधीक्षकच रहांगडाले यांचे नातेवाईक म्हणून समोर आले. त्यांनीच रहांगडाले यांना वॉर्ड क्र. १ मध्ये भरती केले आणि उपचारही सुरू केले. त्यांना कपड्यांपासून ते औषधे व जेवणाचीही सोय करून दिली. समाजसेवा अधीक्षकांनी रहांगडाले यांना उपचारादरम्यान पत्ता विचारण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, रहांगडाले यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रतिसाद देत नव्हते तरीही अधीक्षकांचे प्रयत्न सुरूच होते. मागील अडीच महिन्यांच्या उपचारानंतर गेल्या तीन दिवसांपासूर्वी रहांगडाले यांनी यवतमाळचे रहिवासी असल्याची पुसटशी ओळख दिली. अधीक्षकांनी यवतमाळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.पोलिसांनी नोंदविले बयानरहागंडाले यांचे प्रकरण समाजसेवा अधीक्षकांनी यवतमाळ पोलिसांसमोर मांडले. यवतमाळचे पोलीस मंगळवारी नागपूर मेडिकलमध्ये पोहोचले. रहांगडाले यांचे बयान नोंदविले. रहांगडालेकडून पत्ता मिळाल्यामुळे पोलीस आता रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधणार आहेत. २२ फेबु्रवारीला नातेवाईक रहांगडाले यांना नेण्यासाठी येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. समाजसेवा अधीक्षक नैतिक कर्तव्यासह माणुसकीचा परिचय नेहमीच देतात. या प्रकरणातही अधीक्षकांनी पुढाकार घेतल्यामुळे तब्बल अडीच महिन्यानंतर रहांगडाले यांची नातेवाईकांशी भेट होणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर