शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

उपराजधानीत वर्षभरात सहा हृदयांना मिळाले नाहीत रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:03 IST

देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले.

ठळक मुद्देहृदय प्रत्यारोपणाच्या मंजुरीनंतरही रुग्ण मिळेना सगळ्याची धाव पुणे, मुंबई, चेन्नईकडे

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले. उर्वरीत सहा हृदय विमानसेवेसह इतरही सेवा तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने वाया गेले. सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. परंतु गरजु रुग्ण विदर्भाच्या बाहेर जाऊन नोंदणी करीत असल्याने अवयव असून त्याचा उपयोग होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे, सोमवारी अपघातात जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या सूरज दूधपचारे या अवयव दात्याच्या हृदयालाही रुग्ण मिळाला नसल्याने ते मातीमोल झाले.अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदू मृत’ अवयवदाता सात जणांना जीवनदान देतो तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. उपराजधानीत अवयवदानाला चांगले दिवस येऊ पाहत आहे. आता नागपुरात केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपणच नाही तर यकृत प्रत्यारोपणालाही सुरुवात झाली आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. कौशल्यप्राप्त डॉक्टर, तज्ज्ञ मनुष्यबळ व आवश्यक सोयींना घेऊन ही परवानगी मिळाली आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र ठरले आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यात एका रुग्णानेही हृदय प्रत्यारोपणाची नोंदणी केली नाही. विदर्भातील रुग्ण पुणे, मुंबई, औरंगाबाद, चेन्नई व दिल्ली येथे नोंदणी करीत असल्याने येथील रुग्णांचे हृदय, फुफ्फुस बाहेर जात आहे. यातही वेळेवर विमानसेवा, हवामानाची साथ व रुग्णाची उपलब्धतानंतरच रुग्णापर्यंत अवयव पोहचत असल्याने आतापर्यंत तीनच हृदय विदर्भाबाहेर पोहचू शकले.

चेन्नईला दोन तर मुंबईला एक हृदय गेले४जानेवारी २०१८ ते आतापर्यंत ११ मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांकडून प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) पुढाकारामुळे २० मूत्रपिंड, ११ यकृत, तीन हृदय, एक फुफ्फुस, १६ बुबूळ व दोन दात्याकडून त्वचा मिळाली. यात ‘नोटो’च्या मदतीने केवळ दोन हृदय चेन्नई तर एक हृदय ‘रोटो’च्या मदतीने मुंबई येथील रुग्णाला मिळाले. सहा हृदय उपलब्ध झाले असताना रुग्णाअभावी ते मातीमोल झाले.

रुग्णांनी विश्वास दाखवायला हवाएकीकडे अवयव मिळत नसल्याने रुग्ण मृत्यूशी लढा देत आहे, दुसरीकडे अवयव असताना रुग्ण मिळत नसल्याची शोकांतिका आहे. नागपुरात तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त डॉक्टर, अनुभवी मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध असल्यामुळेच आरोग्य विभागाने हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी दिली आहे. रुग्णांनी येथेही नोंदणी करून विश्वास दाखवायला हवा. यामुळे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव मातीमोल होणार नाही.-डॉ. रवी वानखेडेसचिव, झेडटीसीसी नागपूर

टॅग्स :Healthआरोग्यOrgan donationअवयव दान