शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

२६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:08 IST

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर विदर्भ, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात खंडग्रास : दक्षिण भारतातून दुर्मिळ कंकणाकृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर विदर्भ, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल.कंकणाकृती सूर्यग्रहण दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणवेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते. चंद्र, सूर्याचे बिंब सारखेच दिसते. त्यामुळे सूर्यबिंब चंद्रबिंबाने झाकले जाते. परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते. या घटनेत सूर्यबिंब मोठे आणि चंद्रबिंब लहान असते. चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. ग्रहणवेळी चंद्राची गडद सावली केवळ ११८ किलोमीटरच्या रुंद पट्ट्यातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.येथे दिसेल सूर्यग्रहणकंकणाकृती ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया, ओमान, भारत, सिंगापूर, मलेशिया, फिलिप्पीन, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातून दिसेल. दक्षिण भारतात केरळमधील (कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड), कर्नाटकातील (मंगलोर, म्हैसूर), तामिळनाडूतील (कोईमतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई) येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून ६० ते ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.खंडग्रास ग्रहणाची सुरुवात २६ डिसेंबरला सकाळी ७.५९.५३ वाजता होईल. खग्रास ग्रहणाची सुरवात ९.०४.३३, खग्रास ग्रहण मध्य १०.४७.४६, खग्रास ग्रहणाचा शेवट १२.३०.५५, खंडग्रास ग्राहणाचा शेवट ०१.३५.४० वाजता होईल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८.१० वाजेपासून दिसेल. ९.३२ वाजता ग्रहण मध्य असेल तर ११ वाजता ग्रहण समाप्ती होईल.कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून सूर्यग्रहण पाहावे. मात्र सूर्यग्रहण साध्या डोळ्याने पाहू नये. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळे खराब होतात किंवा अंधत्व येऊ शकते. प्रा सुरेश चोपणे, सदस्य सायन्स नासा.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण