शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांपासून नागपुरातील शासकीय रुग्णालये ‘फोल्डेबल लेन्स’च्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:20 IST

२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही.

ठळक मुद्देमोतीबिंदू शस्त्रक्रियेत गरिबांशी भेदभाव

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारण २००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु १७ वर्षांचा कालावधी होत असताना शासनाकडून आवश्यक असलेले घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही. दुमडत नसलेले ‘रिजीड लेन्स’ दिले जात असल्याने एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णालयात जास्त दिवस घालविण्यापासून ते चष्म्याचा वाढलेला नंबर मिळतो. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच ‘फोल्डेबल लेन्स’ घेऊ शकत असल्याने मोतीबिंदू रुग्णांसोबत हा भेदभाव कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, शासन विकत घेत असलेल्या ‘रिजीड लेन्स’च्या तुलनेत ‘फोल्डेबल लेन्स’ साधारण ४०० रुपयांनी महाग आहे. नुकतेच सुरुवात झालेल्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेच्या अनुषंगाने तरी गरीब रुग्णांना ‘फोल्डेबल लेन्स’ उपलब्ध होईल, अशी आशा गरीब रुग्ण बाळगून आहेत.डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक भिंग अपारदर्शक झाल्यास त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत तो मोत्यासारखा दिसतो. म्हणून त्याला मोतीबिंदू हे नाव पडलंय. पूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत डोळ्यात इंजेक्शन देऊन तो बधिर करून सुमारे १०-१२ मिमी इतका लांब छेद कॉर्नियाच्या परिघावर घेत असत. आतलं भिंग बाहेर काढून डोळ्याची जखम टाके घेऊन शिवून टाकत. या शस्त्रक्रियेनंतर, मस्तक जराही हलवू न देता हॉस्पिटलमध्ये सात दिवस सक्तीची विश्रांती आणि महिनाभर डोक्याला ड्रेसिंग असा कार्यक्रम असायचा. २००१ पासून फॅको उपकरण उपलब्ध झाल्याने ‘फॅकोमात्सिफिकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होऊ लागल्या. यात कॉर्नियाच्या परिघावर केवळ २ ते ३ मि.मी. इतका लहान छेद घेऊन ‘फोल्डेबल लेन्स’ बसविणे सुरू झाले. छेद लहान असल्याने तो आपोआप बरा होतो. , म्हणून याला बिनटाक्याची शस्त्रक्रियाही म्हटले जाते. परंतु आज १७ वर्षांचा कालावधी होत असतानाही आरोग्य विभागाकडून किंवा राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’कडून दुमडत नसलेला जुनाट ‘रिजीड लेन्स’ उपलब्ध करुन दिला जात असल्याने गरीब रुग्णांना गैरसोयीचे होत आहे. यात कॉर्नियाच्या परिघावर ६ ते ७ मि.मी आकाराचा छेद करावा लागत असून एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णांना जिथे काही तास रुग्णालयांत घालवायचे असतात तिथे दोन दिवस घालवावे लागतात. चष्म्याचा नंबरही वाढत असल्याने त्यांच्या दैनंदिन कष्टाच्या कामकाजात समस्या निर्माण होतात.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय