शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ९२५ गावांमध्ये कापसावर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:03 IST

राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ गावांमध्ये कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देकॉपसॅपचा अहवाल : शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ गावांमध्ये कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.राज्यात कापूस पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच कपाशीची ३८.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली असून पिके वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.कॉपसॅपच्या अहवालानुसार राज्यातील ९२५ गावांमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले. कापूस पिकावर वाढ संजीवके, हार्मोन्स, टॉनिक यासारख्या केवळ कायिक वाढीस मदत करमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडींना पोषक ठरते व रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शेतकऱ्यांना किडीच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढतो.या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कीड व रोग नियंत्रित करण्यासाठी कृषी सल्ला शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. वाढ संप्रेरक प्रत्यक्ष पीक उत्पादन वाढीबाबत ठोस निष्कर्ष नाहीत अथवा अशा प्रकारच्या शिफारशी अद्यापही कृषी विभागाकडे व संशोधन केंद्रांनी केलेल्या नाही. तसेच या औषधी व रसायनांना केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यामध्ये मान्यता देण्यात आली नाही. केवळ आकर्षक जाहिराती, सुबक पॅकिंग तसेच कोणत्याही अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. तसेच अधिक महितीसाठी जवळच्या कृषी सहायक, कृषी अधिकारी तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी