शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य जमीनदोस्त

By admin | Updated: May 10, 2017 02:23 IST

गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांनी कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी यांच्याविरुद्ध धडक कारवाईची मोहीम सुरू केली.

तवक्कल हाऊसिंग सोसायटीतील १६० घरे पाडली : पोलीस, मनपा आणि नासुप्रची कारवाई गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांनी कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी यांच्याविरुद्ध धडक कारवाईची मोहीम सुरू केली. त्यामुळे ग्वालबन्सी टोळीच्या दहशतीत जगणारे अनेक पीडित रस्त्यावर आले असून, त्यातील अनेकांनी आपापल्या जमिनी, भूखंडाचा ताबाही घेतला आहे. दरम्यान, भूमाफिया ग्वालबन्सी टोळीने केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर अनेक सरकारी जमिनी, गृहनिर्माण सोसायट्यांच्या जमिनीही हडप केल्या आहेत. अनेक एकराच्या आणि सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपये किंमत असलेल्या या जमिनीवर कुख्यात भूमाफिया ग्वालबन्सी टोळीने झोपडपट्ट्या (आता पक्की घरे) वसवल्या आहेत. झिंगाबाई टाकळी परिसरातील तवक्कल हाऊसिंग सोसायटीच्या मालकीच्या २.३३ हेक्टर जागेवर (खसरा क्र.११०/२ व १११/१) ग्वालबन्सी टोळीने २०० ते ३०० झोपड्या वसवल्या होत्या. कुणाकडून ५० हजार तर कुणाकडून १ लाख रुपये घेऊन ग्वालबन्सी टोळीने ही झोपडपट्टी ८ ते १० वर्षांपूर्वी वसविली. आता येथे सिमेंट काँक्रिटची पक्की दोन ते तीन मजली घरे उभी राहिली आहेत. त्यासंबंधाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी ५ मे रोजी एक विशेष बैठक घेतली होती. त्यात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. भूमाफिया ग्वालबन्सी टोळीचे जंगलराज उद्ध्वस्त करण्यासाठी या बैठकीत विशेष ‘अ‍ॅक्शन प्लान’ तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, या जागेवर गेल्या १० वर्षांपूर्वी लोकांनी अतिक्रमण करून घरे उभारली होती. या संदर्भात उमेश दयाशंकर चौबे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने येथील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. स्फोट घडविण्याचा प्रयत्न अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू होण्याची कुणकुण लागताच ग्वालबन्सीचे काही भाडोत्री गुंड तेथे पोहचले. त्यात काही वादग्रस्त महिला-पुरुषांचाही समावेश होता. त्यांनी परिसरातील महिला आणि लहान मुलांना पुढे केले. त्यांच्या हातात दगडधोंडे देण्यासोबतच काहींनी वेगवेगळ्या रंगांचे झेंडे हाती घेऊन या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. एका गुंडाने चिथावणी देऊन जमाव भडकावण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या एकाने सिलिंडरची नळी काढून या भागात गॅस (वायू ) पसरवून स्फोट घडवून आणण्यासाठी आगपेटी हातात घेतली. मात्र, आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्याची कानशेकणी करून त्याने केलेला सिलिंडर स्फोटाचा प्रयत्नही पोलिसांनी उधळून लावला. या सर्वांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांचा विरोध मोडून काढला. एक-दोनवेळा परिस्थिती चिघळत असल्याचे संकेत मिळताच पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. अनेकांची तारांबळ, रडारड या कारवाईत ज्या घरांवर बुलडोझर चालला, त्यातील बहुतांश घरे पक्की (स्लॅबची) होती. यात राहणारी बहुतांश मंडळी मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमधील मूळ निवासी आहेत. त्यातील अनेक जण बांधकाम व्यवसायाशी गुंतलेली आहेत. काही जण फळ, भाज्या विकणारे तर काही दाबेली, पाणीपुरी विकणारे आहेत. काही जण मजुरी करणारेही आहेत. ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांना पैसे देऊन त्यांनी ही जागा घेतली अन् येथे आपले बस्तान मांडले. अचानक असे काही होईल, अशी त्यातील अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे घर पाडल्यानंतर कुठे जावे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. काहीं जणांनी मात्र लागचीच छोटे ट्रक, टेम्पो, मेटॅडोर बोलवून आपले सामान दुसरीकडे भरून नेले. सामान हलविण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली होती. जे अत्यंत गरीब होते, ते आपापल्या चिल्यापिल्यांना घेऊन नुसतेच रडत होते. त्यातील रिवा येथील कमल शाहू ही महिला आपले सामान बाहेर काढताना वेड्यागत घराकडे बघत होती. विशेष सतर्कतेमुळे विरोध ग्वालबन्सीचे गुंड या कारवाईचा विरोध करण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा होती. जाती धर्माचे नाव पुढे करून या कारवाईला वादग्रस्त करण्याचे ग्वालबन्सी टोळी प्रयत्न करणार, अशीही भीती होती. म्हणून पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी विशेष खबरदारीच्या सूचना कारवाईसाठी पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, एसीपी मडवी, एसीपी तायवाडे, कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे, पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, नवीन कामठीचे मुळक, यशोधरानगरचे मुजावर यांच्यासह सुमारे १० वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि विशेष (आरसीपी) पथकासह ५०० च्या आसपास पोलीस कर्मचारी कोराडी पोलीस ठाण्यात पोहचले. तेथून ते थेट कारवाईच्या ठिकाणी पोहचले. तिकडून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे गौतम पाटील, संजय कांबळे, मंजू शहा, नासुप्रचे वसंत कन्हेरे आणि त्यांचे १०० कर्मचारी पोहचले. पोलिसांकडे दंगाविरोधी पथक, वरुण, वज्र आणि मोठी पाच ते दहा वाहने होती. तर, महापालिकेच्या ताफ्याने १० बुलडोजर, २५ ते ३० ट्रक व टिप्पर आणले होते. कारवाईला विरोध कारवाई सुरू करताच रहिवाशांनी विरोधाचा पवित्रा घेतला. महापालिका व नासुप्र यांनी कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता घरे पाडू शकत नाही, असा युक्तिवादही केला. आम्ही येथे पक्की घरे उभारली आहे. आम्हाला महापालिकेकडून घरटॅक्स, आकारला जातो. पाणी पुरवठा केला जात होता. एसएनडीएलने येथील ३०० घरांना वीज मीटर दिले आहे. या भागात रस्त्यांचेही काम करण्यात आले आहे. जर ही घरे अतिक्रमण करून उभारण्यात आली तर येथे या सुविधा क शा उपलब्ध करून देण्यात आल्या, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. मात्र, पोलिसांनी त्यांना कोर्टाच्या आदेशाची प्रत दाखवून गप्प केले. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा काय परिणाम होतो, त्याचीही कल्पना दिली. त्यांना आपापल्या किमती चीजवस्तू सुरक्षित बाहेर काढून घेण्याची सूचना करून तशी वेळही दिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या सामानाच्या सुरक्षेच्या कामी लागले.