शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:34 IST

भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडले: चार बचावले : मानकापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकले. बचाव कार्य करणाºयांनी विहिरीतून चौघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.गायत्रीनगर झिंगाबाई टाकळी परिसरातील सचिन ले-आऊटमध्ये राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून यादवराव चौधरी (वय ७०) यांचा परिवार भाड्याने राहतो. यादवराव चौधरी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते त्यांचा मुलगा सुधीर (वय ३७), सून सुरेखा (वय ३५) आणि वेदांत (वय ५) तसेच अंकुश (वय २ वर्षे) तेथे राहतात.विहीर खचली, चिमुकल्याचा अंतसुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले. चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.सुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले.चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.