शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:19 IST

नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनासुप्रचा निर्णय : हायकोर्टाच्या आदेशाचा परिणाम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.या रुग्णालयाला नागपूर सुधार प्रन्यासची जमीन लीजवर देण्यात आली होती. हे रुग्णालय २०१० पासून बंद आहे. त्यामुळे ही जमीन निरुपयोगी पडून राहू नये, यासाठी लीज करारावर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्यानुसार नासुप्रने २४ डिसेंबर २०१९ रोजी या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि जमिनीचे वाटप व लीज करार रद्द करण्याचा आदेश जारी केला.यासंदर्भात नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे संस्थापक-सदस्य डॉ. बालचंद्र सुभेदार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने काही डॉक्टरांनी १९७० मध्ये नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय ही संस्था स्थापन केली. नासुप्रने या संस्थेला रुग्णालय सुरू करण्यासाठी जमीन लीजवर दिली. दरम्यान, २०१० मध्ये रुग्णालय बंद पडले. हे रुग्णालय इतर इच्छुकांना चालवायला देण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. तसेच, संस्थादेखील रुग्णालयाला पुनरुज्जीवित करू शकली नाही. परिणामी, ती जमीन परत घेऊन तिचा जनहितासाठी उपयोग करावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.मल्टिस्पेशालिटीची मागणी, समितीसाठी नावे सादरगरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार स्वस्त दरात उपलब्ध व्हावेत, याकरिता या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याची मागणी असल्यामुळे, न्यायालयाने यासाठी समिती स्थापन करण्याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नावे सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार, बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. लोकेंद्र सिंग, झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी, राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुभ्रजित दासगुप्ता व कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे माजी कुलगुरू डॉ. एस. डब्ल्यू. कुलकर्णी यांची नावे न्यायालयाला देण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटलNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास