शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:06 IST

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमाती परीक्षणात आढळली अन्नद्रव्याची कमतरता पारंपरिक खतांची उपयोगिता वाढविणे गरजेचे

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील शेतीच्या केलेल्या माती परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही होत आहे.जमिनीची उत्पादकता ही १६ अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य अन्नघटक म्हणजे नत्र, स्फुरद व पलाश आहे. तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश आहे.सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मिनरल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरिन यांचा समावेश आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील केलेल्या माती परीक्षणातून महत्त्वाचे घटक असलेल्या नत्राची कमतरता प्रत्येक तालुक्यात आढळली आहे. तर स्फुरद या अन्नघटकाची नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात कमतरता आढळली आहे. जमिनीतील या दोन्ही घटकाच्या कमतरतेमुळे झाडे ठेंगू राहून पाने पिवळी होणे, पाने वाळून गळणे, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा रंग बदलणे आदी लक्षण झाडांवर दिसून येत आहे. त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म घटकांमध्येही कमतरता आढळली आहे. झिंक अन्नघटकाची नागपूर सोडल्यास इतर सर्व तालुक्यात कमतरता आढळली आहे. लोहतत्त्वसुद्धा सर्वच तालुक्यात घटलेले आहे. लोहामुळे पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो. झिंकमुळे झाडे लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोठ्या भाजीपाल्याचे उत्पादन होते. जमिनीत जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मानवी आरोग्यास आवश्यक असलेले पोषक घटक उपलब्ध होत नाही.

शरीरावर परिणाम होतोसेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे नत्राची कमतरता झाली आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम तर होतच आहे; सोबतच मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वाची कमतरता आढळल्याने शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे.

नत्र वाढविण्यासाठी उपाययोजनाजमिनीतील सेंद्रिय कर्व्ह वाढविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकºयांनी जास्तीत जास्त शेणखत, गांडुळखत, नॅपेड खत, सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खतसुद्धा वापरल्यास जमिनीतील नत्राची मात्रा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर द्विदल पिके घेऊन पिकाचे रोटेशन करण्यात यावे.अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती