शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:51 IST

मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देआवश्यक निधी मिळणार : पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.बैठकीला रवींद्र कुंभारे, प्रकाश पाटील, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्वे नं २२७ आणि २२८ मधील ३.२२ हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. भूसंपादनापूर्वी ही जमीन मिहानच्या नावाने होती. त्यामुळे भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेकॉर्ड दुरुस्ती केली. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम १९/३ची कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठ़ी दोन महिन्याचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनर्वसनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठ़ीची यादी तयार आहे. या यादीवर १२४ आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लॉट वाटपही करण्यात येणर आहे. शेतकºयाला ३००० चौ. फूट, शेतकरी नसेल त्याला १५०० चौ. फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला १००० चौ. फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनर्वसनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि १० हजार रुपये मिहानकडून देण्यात येतील.गावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्यक आहे. यासाठ़ी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. नागरी सुविधा मिहानने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नवीन जागेचे पट्टेवाटपही लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागात असलेली म्हाडाची कॉलनी मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षभरात संपूर्ण गाव नवीन जागेवर वसलेले असेल. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी. तसेच ज्यांना घरे मिळाली पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरूंनी रिकामे करावे असेही सांगण्यात आले.

 

टॅग्स :MihanमिहानChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे