खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रकमेसह घरगुती भांडी असा १६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेड्यातील चिचाेली येथे शुक्रवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
विमल पुरुषाेत्तम चपट (४४, रा. वाॅर्ड क्र. १, चिचाेली) या १० डिसेंबरपासून बाहेरगावी गेल्या हाेत्या. घरी कुणीच नसताना अज्ञात आराेपीने दाराचे कुलूप ताेडून घरात प्रवेश केला. चाेरट्याने घरातील तांब्याची घागर, पितळी गुंडी, स्टीलची कॅटली, तांब्याचा लाेटा, पितळी पिंप आणि राेख १५,००० रुपये असा एकूण १६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. घटनेचा तपास सहायक फाैजदार रामेश्वर कटरे करीत आहेत.