शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुमगाव परिसरात ‘लालपरी’अजूनही रुसलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:09 IST

गुमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू ...

गुमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारी लालपरी अद्यापही सुरू झाली नसल्याने गुमगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सूर असून एस.टी.सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली आहे.

गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, किरमिटी, वडगाव, दाताळा, धानोली, शिवमडका, खडका आदी लगतच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी हिंगणा, बुटीबोरी, डोंगरगाव, खापरी, वानाडोंगरी, नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १८ महिन्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने शर्ती आणि अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या अगोदर नागपूर-वर्धा रोडवरील डोंगरगावमार्गे गुमगाव-हिंगणा येथे एस.टी.च्या अनेक फेऱ्या नियमित सुरू होत्या व त्या गुमगाव बसस्टॅन्डवरूनच पुढे जात असत. त्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या फेऱ्या अतिशय सोयीच्या होत्या. परंतु आता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्याने अध्ययन-अध्यापन प्रत्यक्ष समजून घेण्याची आशा विद्यार्थी मनाशी बाळगून होते. मात्र एस.टी.अभावी विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे.

--

पुलाचे काम कासवगतीने

गेल्या ३० महिन्यापासून पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने एस.टी. कर्मचारी अपूर्ण पुलाचे निमित्त पुढे करून बस गुमगाव स्टॅन्डवर आणण्यास टाळाटाळ करीत असतात. पण आता अनेक पर्याय खुले असल्याने बस गुमगाव बसस्थानकावर येऊ शकते. त्यासाठी प्रथम पर्याय नदीपलीकडील कोतेवाडा येथील आखरापर्यंत बस येऊ शकते. दुसरा पर्याय डोंगरगाव-वागदरा-कोतेवाडा-नागपूर बाह्य वळणमार्गे-समृद्धी द्रुतगती मार्गाजवळून विना अडथळ्याने गुमगाव येथे बस येऊ शकते. तिसरा पर्याय म्हणजे नागपूर-हिंगणा-गुमगाव येथे बस येऊ शकते.

---

गुमगाव परिसरातून शहरातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय असून, आम्हाला शाळेत उपस्थित राहण्यास साधन नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी बस सुरू करून आमची गैरसोय टाळावी.

- मोहन कुंभारे, विद्यार्थी, गुमगाव.

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. दरम्यान, ऑनलाईन प्रणाली जरी कार्यान्वित असली तरी आता आठवी इयत्तेपासून शाळा सुरू झाल्या असल्याने अध्ययन-अध्यापन प्रत्यक्षात शाळेतील वर्गातून मिळावे, यासाठी संबंधित विभागाने एस.टी. बस नियमित सुरू करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळावे.’

- नित्यानंद रमेश बोडणे,

उपसरपंच - गुमगाव.