शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची विकासकामे मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा; नागपूर स्थानकावर रेल्वे प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 11:14 IST

मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.

ठळक मुद्देकेवळ महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी झाला परिसर स्वच्छ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर उद्यान तयार करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले. बाहेरुन शोभेची झाडे, कुंड्या आणण्यात आल्या. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागत असून रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेचे अभियान सुरु केले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात एक आरक्षित तिकिटांचे तर दोन अनारक्षित तिकिटांचे कार्यालय आहे. येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरक्षण कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. पिण्याचे पाणी तर सोडा परंतु साध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. व्यवस्थाच नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक लघुशंकेसाठी रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग, नव्याने तयार करण्यात आलेले गार्डन, आरपीएफ शेजारील अपंगांचे पार्किंग याचा वापर करताना दिसतात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील भागात लाखो रुपये खर्चून विकासकामे केली. परंतु प्रवाशांना साध्या पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नसल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत.

विनाकारण होते दंडात्मक कारवाईनागपूर शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिक रेल्वेस्थानकात प्रवेश करून प्लॅटफार्मवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जातात. बाहेर पडताना टीसीची नजर संबंधित नागरिकावर गेल्यास ते त्याला पकडतात. विनातिकीट समजून रेल्वेस्थानकात प्रवेश केल्याबद्दल २५० रुपये दंड ठोठावतात. यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशीरेल्वे मंत्रालयाने अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन पथनाट्य, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून न दिल्यामुळे स्वच्छता अभियानाला रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिल्याचा भास होत आहे. येथे स्वच्छतेबाबत कोणतीच खबरदारी प्रशासन घेताना दिसत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर