शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाखानींना २५ लाखांचा गंडा : नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:06 IST

जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ठळक मुद्देजळगावच्या शेंगदाणा व्यापाऱ्याची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.खुशाल भगवानदास लाखानी (वय २४, रा. आदर्शनगर, जळगाव) हे आशीर्वाद अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने राजकोट (गुजरात) येथून शेंगदाण्याचा व्यवसाय करतात. लाखानी दलालांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मागणीनुसार माल पाठवितात.१५ नोव्हेंबर २०१८ ला कळमन्यातील कृष्णा ट्रेडिंग कंपनी, कन्हैयालाल लालवानी (रा. इतवारी मस्कसाथ) याने लाखानी यांच्याशी संपर्क करून त्यांनी श्री कॉर्पोरेशनच्या मालकाचा नंबर दिला. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला मोठी ऑर्डर मिळेल, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार लाखानी यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता, त्याने बालाजी कन्व्हर्सर(दलाल, इतवारी बाजार)चा संपर्क क्रमांक देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार लाखानींनी बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकासोबत संपर्क केला असता त्याने १६ टन शेंगदाण्याची ऑर्डर दिली. माल पोहचल्यानंतर चार दिवसांनी पेमेंट मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार लाखानींनी ३ जानेवारी २०१९ ला जलाराम ट्रान्सपोर्ट राजकोट येथून कृष्णा ट्रेडिंगमध्ये १२ लाख ६० हजारांचा शेंगदाणे पाठविले. ७ जानेवारीला शेंगदाणे नागपुरात पोहचले. त्यानंतर बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकाने संक्रांतीपूर्वी २५ टन शेंगदाणे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार लाखानींनी पुन्हा १७ लाख ७९ हजार ७५० रुपयांचा माल बालाजी कन्व्हर्सरला पाठविला. १२ जानेवारीला तो येथे पोहचला. ठरल्याप्रमाणे एकूण ४१ टन शेंगदाण्याचे ३० लाख ३९ हजार ७५० रुपये लाखानींना घ्यायचे होते. मात्र, त्यातील केवळ ५ लाख रुपये लाखानींना देऊन कृष्णा ट्रेडर्स तसेच बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकांनी २५ लाख ३९ हजार ७५० रुपयांची रक्कम हडपली. एवढेच नव्हे तर लाखानी ज्या मोबाईलवर संपर्क करीत होते, ते फोन आणि आपली दुकाने बंद करून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने लाखानी यांनी बुधवारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.अनेकांना गंडाया दलालांनी ज्या पद्धतीने आपली दुकाने बंद करून येथून पळ काढला. त्यावरून त्यांनी लाखानींसारखाच अन्य व्यापाऱ्यांनाही गंडा घातला असावा, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी